शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
2
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
3
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
4
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
5
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
6
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
7
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
8
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
9
CSK vs MI: अवघ्या २१ धावांची खेळी, तरीही सूर्यकुमार यादवने मोडला किरॉन पोलार्डचा विक्रम
10
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
11
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
12
हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'
13
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
14
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
15
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
16
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
17
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
18
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
19
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
20
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
Daily Top 2Weekly Top 5

न.प. स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या समस्या निकाली काढा

By admin | Updated: May 11, 2017 00:46 IST

स्थानिक नगर पालिकेमधील स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून शासनाच्या नियमांना डावलून काम घेतल्या जात आहे.

नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना साकडे लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : स्थानिक नगर पालिकेमधील स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून शासनाच्या नियमांना डावलून काम घेतल्या जात आहे. आठ-आठ तास अधीक स्वच्छता कर्मचाऱ्यांना घाणीत राहून काम करावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून पालिकेमधील स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या तात्काळ निकाली काढाव्यात अशी मागणी महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी संघटनेच्यावतीने वर्धा न.प.च्या मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनातून, वर्धा नगर पालिकेमधील सफाई कामगारांकडून आठ तास जास्तीचे कामे करून घेतल्या जात आहे. ते सतत घाणिच्या संपर्कात राहत असल्याने त्यांना मलेरीया, डेंग्यू, टि.बी., हिवताप आदी विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. जास्तीच्या कामाचा बोझा सफाई कामगारांवर लादल्या जात आहे. पागे समितीच्या शिफारशीनुसारच सफाई कामगारांकडून कामे घेणे क्रमप्राप्त असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. कामे घेताना अधिकाऱ्यांकडून दाट दपट केले जात असून हा प्रकार निंदनिय असल्याचा आरोप करीत स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या निकाली काढण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. मागणीवर सहानुभूतीपूर्वक विचार न झाल्यास महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी संघटनेच्यावतीने कामबंद आंदोलन करीत बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. सदर निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकाऱ्यांसह नगर विकास मंत्रालयासह आदींना पाठविण्यात आले आहे. न.प.च्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देताना जिल्हाध्यक्ष रमेश मोगरे, रवी माकरे, उमेश समुद्रे, दीपक ब्राह्मणे, गोपी व्यास, विनोद तांबेकर आदींची उपस्थिती होती. आठ तास जादा घेतले जाते काम वर्धा न.प.तील स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून दाट दपट करून आठ-आठ तास अधिकचे काम करून घेतले जात आहे. सदर प्रकारामुळे त्यांच्या आरोग्य धोक्यात आले असून योग्य कार्यवाहीची मागणी आहे.