न.प. माजी आरोग्य सभापतींच्या पत्नी ‘पॉझिटिव्ह’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 05:00 IST2020-06-28T05:00:00+5:302020-06-28T05:00:26+5:30

अमरावतीवरून परतल्यावर या महिलेला क्वारंटाईन करण्यात आले होते. शिवाय त्यांचा स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल शनिवारी कोविड पॉझिटिव्ह आला आहे. याची माहिती मिळताच महसूल, पोलीस आणि नगरपालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी जाजुवाडी परिसर गाठून परिसर सील करण्यास सुरूवात केली.

N.P. Former health speaker's wife 'positive' | न.प. माजी आरोग्य सभापतींच्या पत्नी ‘पॉझिटिव्ह’

न.प. माजी आरोग्य सभापतींच्या पत्नी ‘पॉझिटिव्ह’

ठळक मुद्देआर्वी शहरातील जाजूवाडी परिसर सील। तीन व्यक्तींचे स्वॅब पाठविले तपासणीला

लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : शहरातील एका बँकेत रोखपाल म्हणून काम करणाऱ्या आणि आर्वी न.प.च्या माजी आरोग्य सभापतीच्या पत्नीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आर्वी शहरातील जाजुवाडी परिसर सील करण्यात आला आहे. या नव्या २९ वर्षीय कोरोना रुग्णाला तातडीने सेवाग्राम येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
अमरावतीवरून परतल्यावर या महिलेला क्वारंटाईन करण्यात आले होते. शिवाय त्यांचा स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल शनिवारी कोविड पॉझिटिव्ह आला आहे. याची माहिती मिळताच महसूल, पोलीस आणि नगरपालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी जाजुवाडी परिसर गाठून परिसर सील करण्यास सुरूवात केली. न.प.च्या माजी आरोग्य सभापतीच्या पत्नी या अमरावती येथे त्यांच्या माहेरी गेल्या होत्या. काही दिवसांपूर्वी त्या आर्वी येथे परतल्या होत्या, अशी माहिती आर्वी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नरेश सुटे यांनी सांगितले. सदर कोरोना बाधित महिलेला आरोग्य विभागाच्या अधिकाºयांनी रुग्णवाहिकेने सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल केले.

निकट संपर्कातील व्यक्तींचा घेतला जातोय शोध
सदर कोरोना बाधित महिला या आर्वी येथील एका बँकेत रोखपाल म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे या बँकेला सील करण्यासह सदर कोरोना बाधिताच्या निकट संपर्कात कोणकोण व्यक्ती आलेत याचा शोध शासकीय यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी घेत आहेत.

कोरोना बाधित महिलेच्या पतीसह त्यांच्या सासु आणि सासरे हे निकट संपर्कात आल्याने त्यांच्या घशातील द्रवाचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता झोपाटे यांनी सांगितले.

Web Title: N.P. Former health speaker's wife 'positive'