शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ नऊ चोऱ्यांचा कुठलाही सुगावा नाही

By admin | Updated: October 20, 2014 23:16 IST

शहरालगत असलेल्या पिपरी (मेघे) व सिंदी (मेघे) परिसरात एकाच रात्री नऊ ठिकाणी घरफोड्या झाल्या. यात पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेतला असता त्यांना एका नाल्यात चोरट्यांनी बदलविलेले कपडे

वर्धा : शहरालगत असलेल्या पिपरी (मेघे) व सिंदी (मेघे) परिसरात एकाच रात्री नऊ ठिकाणी घरफोड्या झाल्या. यात पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेतला असता त्यांना एका नाल्यात चोरट्यांनी बदलविलेले कपडे व घरफोड्या करताना वापरण्यात आलेले शस्त्र आढळले. ते जप्त केले; मात्र चोरटे पकडण्यात पोलिसांना अद्याप यश आले नाही.या चोऱ्यांत सुमारे पाच लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला होता. या प्रकरणी शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही चोरी पारधी बेड्यावरील लोकांनी केला असल्याचा संशय घेत पोलिसांनी शहरालगत असलेल्या पारधी बेड्यांवर तपास मोहीम राबविली. मात्र त्यांच्या हाती काहीच आले नाही. या तपासादरम्यान पोलिसांना येळाकेळीकडे जाणाऱ्या मार्गावरील एका नाल्यात चोरट्यांनी बदलविलेले कपडे व चोरीत वापरलले शस्त्र सापडले. यातून चोरट्यांचा काही सुगावा लागेल असे वाटत असताना कुठलाही सुगावा लागला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.निवडणूक कामात पोलीस व्यस्त असल्याने चोरट्यांच्या शोधात पोलीस पथक रवाना करणे शक्य झाले नसल्याचे सांगण्यात आले आहे. या संदर्भात सोमवारी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलिसांची एक बैठक बोलाविण्यात आल्याची माहिती आहे. येथूनच पोलिसांचे पथक तयार करून त्यांना वेगवेगळ्या दिशेने पाठविण्याबाबत चर्चा करण्यात येणार असल्याचे शहर ठाण्यातून सांगण्यात आले आहे. तपासात पोलिसांच्या हाती काही येते वा नाही याकडे साऱ्यांचे लक्ष आहे. (प्रतिनिधी)