एकही बालक पोलिओ लसपासून वंचित राहता कामा नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 06:00 AM2020-01-20T06:00:00+5:302020-01-20T06:00:12+5:30

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम सध्या राबविण्यात येत आहे. पाच वर्षाखालील सर्व बालकांना ही लस द्यावयाची आहे. राष्ट्रीय कर्तव्य समजून या मोहिमेच्या यशस्वीतेकरिता सर्वांनी सहकार्य करावे, असे यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी यांनी सांगितले. सदर मोहिमेकरिता जिल्ह्यात एकूण १ हजार ३४१ लसीकरण केंद्र तयार करण्यात आली होती.

No child should be denied polio vaccine | एकही बालक पोलिओ लसपासून वंचित राहता कामा नये

एकही बालक पोलिओ लसपासून वंचित राहता कामा नये

Next
ठळक मुद्देसचिन ओम्बासे : पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पोलिओमुक्त भारत हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पल्स पोलिओ मोहीम राबविली जात आहे. आज या मोहिमेचा प्रारंभ झाला असून मोहिमेच्या यशस्वीतेकरिता प्रयत्न करणाऱ्यांनी एकही बालक पोलिओ लस घेण्यापासून वंचित राहू नये याची दक्षता घेतली पाहिजे, असे प्रतिपादन जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी केले. ते पोलिओ लसीकरण मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी मार्गदर्शन करताना बोलत होते.
जिल्हा सामान्य रुग्णालयात आयोजित विशेष कार्यक्रमाला नवनिर्वाचित जि.प. सभापती मृणाल माटे, अपर पोलीस अधीक्षक नीलेश मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्त्म मडावी, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल वानखडे, माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. प्रभाकर नाईक, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन निमोदिया, डॉ. प्रवीण धाकटे, डॉ. संजय गाठे, डॉ. एच. बी. खुबनानी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम सध्या राबविण्यात येत आहे. पाच वर्षाखालील सर्व बालकांना ही लस द्यावयाची आहे. राष्ट्रीय कर्तव्य समजून या मोहिमेच्या यशस्वीतेकरिता सर्वांनी सहकार्य करावे, असे यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी यांनी सांगितले. सदर मोहिमेकरिता जिल्ह्यात एकूण १ हजार ३४१ लसीकरण केंद्र तयार करण्यात आली होती. याच केंद्रातून पाच वर्षा खालील बालकांना रविवारी पोलिओची लस देण्यात आली.
यंदाच्या मोहिमेदरम्यान ग्रामीण भागातील ७९,७०२ तर शहरी भागातील ३०,१३१ बालकांना लस देण्याचे निश्चित करण्यात आले होते. शिवाय टोल नाके, बसस्थानक, रेल्वे स्थानक आदी ठिकाणी बालकांना पोलिओ लस देण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. इतकेच नव्हे, तर एकूण ९३ मोबाईल टीमद्वारे वीटभट्टी, गिट्टी खदान, ऊस तोडणीचे काम करणाऱ्यांच्या बालकांना पोलिओची लस देण्यात आली.
मोहिमेच्या यशस्वीतेकरिता आरोग्य विस्तार अधिकारी विजय जांगडे, भारती फुनसे, सविता खुजे, विवेक दौड, खंडाते, विजय ढगे, संदीप चव्हाण, नाना सुरकार आदींनी सहकार्य केले.
 

Web Title: No child should be denied polio vaccine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य