शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाचा 'ब्लॉकबस्टर शो'; DMK ला जोरदार धक्का
2
Election Results 2026: मतदारांचा दणका, तीन राज्यात 'सत्ता'बदल! कोणत्या राज्यात कोणाला मिळाला झटका?
3
अभिनेता विजय यांच्या पराभवाची अफवा ऐकून चाहत्याने उचचलं टोकाचं पाऊल; कृष्णागिरीत खळबळ
4
Gold Silver Price News: लग्नसराईच्या काळात सोनं-चांदी झाली स्वस्त; दिल्ली ते मुंबई काय आहे किंमत? पाहा २४K, २२K,१८K सोन्याचा दर
5
"आता पुढचे ७-८ राऊंड ममता बॅनर्जी पुढे राहतील"; पारडे पालटले, मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना सुवेंदू अधिकारींचा दावा
6
पश्चिम बंगालमध्ये भाजपला आतापर्यंत ४५% मतदान, तृणमूलला...;  सुरुवातीच्या कलांत टक्केवारीत मोठी उलथापालथ
7
पनिहाटी मतदारसंघात तृणमूल काँग्रेसला धक्का, आरजीकर बलात्कार पीडितेची आई आघाडीवर
8
SBI कडून ५० लाख रुपयांचं Home Loan हवंय? जाणून घ्या तुमच्या पगाराची अट आणि मासिक EMIचं गणित
9
अंगारक संकष्टी चतुर्थी २०२६: ५ मे रोजी 'असा' भरा इच्छापूर्तीचा कलश; बाप्पा दूर करेल सर्व विघ्नं!
10
Assembly Election Results 2026: पश्चिम बंगाल, तामिळनाडू ते केरळ; कुठे कोणता पक्ष आघाडीवर? निवडणूक आयोगाचे आकडे काय आहेत?
11
West Bengal: ममता बॅनर्जींच्या आधी बंगालमध्ये कोणाची होती हुकूमत? जाणून घ्या स्वातंत्र्यानंतरचा इतिहास
12
Canara Bank मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹९५,३०० चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटी
13
जिओ ग्राहकांना मोठा झटका! ₹२०९ चा लोकप्रिय प्लॅन बंद; आता १GB डेटासाठी मोजावे लागणार जादा पैसे
14
ब्लॉकबस्टर एन्ट्री! अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाने शतक पूर्ण केले; बहुमत गाठणार?
15
ममता बॅनर्जी पिछाडीवर, सुवेंदु अधिकारी आघाडीवर; मोदींनी जिथे झालमुडी घेतली तिथे काय परिस्थिती...?
16
West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी किती हवा आकडा?; भाजपा इतिहास घडवण्याच्या तयारीत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वांचा झंझावात, भाजपा निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने, काँग्रेसची वाताहात  
18
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
19
पतीला भेटायला युवक घरी आला अन्...; कोल्हापुरात डॉक्टर महिलेवर बळजबरी करण्याचा प्रयत्न
20
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज

By admin | Updated: August 9, 2015 02:11 IST

शिक्षक जिल्हा परिषदेचा असो वा खासगी शाळेचा तो अनेक समस्यांनी ग्रासला आहे. त्याच्या समस्या सोडविण्याकरिता केवळ निवेदन देवून ...

शिक्षक संघाचा मेळावा : राज्यातील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती वर्धा : शिक्षक जिल्हा परिषदेचा असो वा खासगी शाळेचा तो अनेक समस्यांनी ग्रासला आहे. त्याच्या समस्या सोडविण्याकरिता केवळ निवेदन देवून काम भागणार नाही तर त्याकरिता शिक्षकांनी एकत्र येत लढा देणे गरजेचे आहे आणि त्यासाठी शिक्षकांनी सघंटित होणे आवश्यक आहे, असे विचार महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे नेते तथा माजी आमदार शिवाजीराव पाटील यांनी व्यक्त केले. येथील एका सभागृहात शनिवारी आयोजित कार्यक्रमात ते विशेष अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संघाचे राज्य अध्यक्ष बाळासाहेब काळे, राज्य सरचिटनिस मधुकर काचोळे, विदर्भ नेते बी. रा. भालतडक, पुणे विभागाचे माधव पाटील जिल्ह्याचे नेते शेषराव गायकवाड यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्ह्याच्या नेत्यांनी शिक्षकांना सोसाव्या लागत असलेल्या अनेक समस्यांची माहिती दिली. शिवाय त्या सोडविण्याकरिता संघाकडून प्रयत्न होत असल्याचेही सांगितले. या समस्या सोडविण्याकरिता सोमवारी सकाळी संघाच्या सर्वच वरिष्ठ नेत्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला. शिवाय याच वेळी शिक्षकांच्या १६ व्या अधिवेशनाची घोषणाही करण्यात आली. ते अधिवेशन पुणे येथे होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. या सभेचे प्रास्ताविक शिक्षक संघाचे लोमेश वराडे यांनी केले. त्यांनी संघाच्या वतीने शिक्षकांकरिता राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. शिवाय वर्षभरात संघाच्यावतीने उभारलेल्या लढ्यातून शिक्षकांच्या सुटलेल्या समस्यांचा उहापोह केला. कार्यक्रमाचे संचालक मोहन कोठे व वर्षा काकडे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार गजानन पुरी यांनी माणले. या कार्यक्रमाला वसंत बोडखे, अजय गावंडे, संजय गायकवाड यांच्यासह शिक्षक संघाचे पदाधिकारी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.(प्रतिनिधी)