शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

गार्इंच्या संरक्षणातच राष्ट्राची प्रगती

By admin | Updated: September 30, 2014 23:39 IST

भारतीय संस्कृतीत अहिंसेला सर्वोच्च स्थान असून प्राण्यांच्या रक्षण व संवर्धनासाठी जागरूकपणे कार्य करतांनाच गाईसारख्या प्राण्यांची हत्या होवू नये, त्यांचे संरक्षण व्हावे, यासाठी समाजासोबतच शासनाने

मुनीश्री समतासागर यांचे प्रतिपादन : गोवंश संरक्षण व संवर्धनासाठी मूक मोर्चावर्धा : भारतीय संस्कृतीत अहिंसेला सर्वोच्च स्थान असून प्राण्यांच्या रक्षण व संवर्धनासाठी जागरूकपणे कार्य करतांनाच गाईसारख्या प्राण्यांची हत्या होवू नये, त्यांचे संरक्षण व्हावे, यासाठी समाजासोबतच शासनाने कायदा करावा व गार्इंच्या संवर्धनाची हमी द्यावी, असे प्रतिपादन मुनीश्री समतासागर महाराज यांनी केले. गोमाता ही राष्ट्रमाता आहे, तिचे संरक्षण करा, यासाठी निघालेल्या अहिंसा, जनजागरण, मुकमोर्चाप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अहिंसा, जनजागरण, मूक मोर्चाचे आयोजन सकल दिगंबर जैन समाज चार्तुमास सेवा समितीतर्फे तसेच स्थानिक सर्व संघटनातर्फे करण्यात आले होते. हा मूकमोर्चा मुनीश्री समतासागर महाराज, मुनीश्री अरहसागर महाराज व एलकश्री निश्चयसागर महाराज यांच्या आशीर्वादात निघाला. यावेळी भारतीय जैन संघटना अध्यक्ष वीरेंद्र भागवतकर, किरीट ओरा, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी मुलचंद बडजाते, सयाजी महाराज, देवेंद्र बडजाते यांच्यासह नागरिक उपस्थित होते. यावेळी गोवंश हत्या प्रतिबंध करावा, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. अहिंसा, जनजागरण मुकमोर्चामध्ये वर्धा शहरासोबतच विदर्भातील तसेच मध्यप्रदेशातील असंख्य जैन बांधव सहभागी झाले होते.मुनीश्री समतासागर महाराज यांनी संपूर्ण गोवंश हत्या करण्यावर बंदी लागावी यासंदर्भात मार्गदर्शन केले. सर्वधर्म अहिंसेच्या मार्गावर जात असताना कुठल्याही प्राण्यांची हत्या करणे हे अहिंसेत बसत नाही. जगा आणि जगू द्या, या तत्त्वानुसार कुठल्याही प्राण्यांना इजा पोहचवली जावू नये, त्यांचे संवर्धन करणे हे राष्ट्राचे कर्तव्य असल्याचे ते म्हणाले.शेती पिकविली तर ती हिरवी होवू शकते. त्यामुळे देशवासियांना अन्नधान्य मिळू शकते; परंतु कत्तलखाने काढले तर त्याचा समाजावरही विपरीत परिणाम होऊ शकतो. भारतामध्ये कत्तलखान्यांना परवानगी देवू नये यासाठी अहिंसेच्या मार्गाने विनंती करण्यासाठी मूकमोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. अहिंसेची ज्योत आणि हे अभियान समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहचविण्याचे आवाहनही मुनीश्री समतासागर महाराज यांनी केले. मूकमोर्चाला सर्कस ग्राऊंड येथून सुरुवात झाली. त्यानंतर अनेकांत स्वाध्याय मंदिर, सराफा लाईन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ विसर्जित झाला. मूकमोर्चामध्ये हजारो जैन बांधव सहभागी होते.(प्रतिनिधी)