शहरं
Join us  
Trending Stories
1
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
2
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
4
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
5
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
6
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
7
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
8
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
9
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
10
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
11
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
12
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
13
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
14
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
15
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
16
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
17
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
18
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
19
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
Daily Top 2Weekly Top 5

नगर पंचायतीने केली बोर नदी पात्राची स्वच्छता

By admin | Updated: May 30, 2016 01:59 IST

बोर नदी पात्राला बेशरमसह अन्य वनस्पतींनी विळखा घातला होता. बोर धरणापासून पुढे वाहणारे पात्र बेशरमने व्यापले आहे.

खोलीकरणही करणार : नागरिकांच्या मागणीची दखल
सेलू : बोर नदी पात्राला बेशरमसह अन्य वनस्पतींनी विळखा घातला होता. बोर धरणापासून पुढे वाहणारे पात्र बेशरमने व्यापले आहे. यामुळे गावांत दुर्गंधी पसरली आहे. शिवाय पाणीही दूषित होत आहे. यामुळे नागरिकांनी बोर नदीचे पात्र स्वच्छ व खोल करण्याची मागणी केली. याबाबत वृत्तही प्रकाशित झाले. नागरिकांच्या या मागणीची नगर पंचायत प्रशासनाने दखल घेतली असून नदी पात्र स्वच्छ व खोल करण्याचे काम सुरू करण्यात आले.
नगर पंचायतीने बोर नदीपात्राचे खोलीकरण व स्वच्छतेला गुरुवारी सुरुवात केली. यामुळे नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत. बोर नदी ही शहर व परिसरातील गावांचे वैभव आहे. याच नदीमुळे अनेक शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध झाली आहे. नदीमुळे काठावरील गावांना पाणीटंचाई जाणवत नाही; पण गत अनेक वर्षांपासून नदीपात्राची स्वच्छता करण्यात आली नाही. यामुळे पावसाळ्यात पुराच्या पाण्याने वाहून आलेला गाळ व बेशरमच्या झुडपांनी पात्र अरूंद झाले. परिणामी, पुराचे पाणी काठावरील गावात शिरण्याची घटना अनेकदा घडली आहे. यात मोठे नुकसान झाले. अनेकांच्या घरांची पडझड होऊन संसार उघड्यावर आले; पण प्रशासनाने नदीपात्र खोलीकरण करण्याकडे दुर्लक्षच केले. विविध संघटनांनी निवेदने दिली; पण याकडे दुर्लक्षच केले जात होते. याबाबत वृत्त उमटल्यानंतर मात्र नगर पंचायत प्रशासनाला जाग आली व कामास प्रारंभ झाला.
नगर पंचायतीने घोराड ते सेलू येथील बंधाऱ्यापर्यंत जेसीबीच्या साह्याने बेशरमची झुडपे, शेवाळ, प्लास्टिक व इतर कचरा काढण्यास सुरुवात केली. इतरही गावांजवळील नदीपात्राचे खोलीकरण करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.(तालुका प्रतिनिधी)