शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
5
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
6
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
7
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
8
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
9
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
10
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
11
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
12
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
13
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
14
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
15
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
16
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
17
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
18
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
19
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
20
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
Daily Top 2Weekly Top 5

संस्कार अ‍ॅग्रोच्या व्यवस्थापनाविरोधात आंदोलन

By admin | Updated: January 5, 2016 02:27 IST

संस्कार अ‍ॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड वायगाव (नि.) येथील कामगारांना वेळेवर वेतन व कंपनीत कायम करण्याची मागणी घेत भीम

वर्धा : संस्कार अ‍ॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड वायगाव (नि.) येथील कामगारांना वेळेवर वेतन व कंपनीत कायम करण्याची मागणी घेत भीम टायगर सेनेच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देण्यात आली. यावेळी सेनेच्या एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. निवेदनामध्ये पाच वर्षे काम करणाऱ्या कामगारांना कायम करण्याचे लिखित आॅर्डर देण्यात यावे, वायगाव ते खरांगणा बस पूर्ववत चालू करण्यात यावी, पॅकिंग विभागातील कामगार ज्या विभागात होते त्यांना त्याच विभागात काम देण्यात यावे, ज्या कामगारांना बोनस मिळाले नाही त्यांना त्वरित बोनस देण्यात यावे यासह तिसऱ्या शिफ्टसाठी महिलांना सक्ती करू नये, कोणत्याही कामगाराला ओ.टी. साठी बळजबरी करू नये, जे व्यक्ती दोन महिन्यांपासून व्यवस्थापनाच्या संपर्कात असून सुद्धा त्यांना कामावर घेतल्या जात नाही. आदी मागण्या करण्यात आल्या. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतेवेळी भीम टायगर सेनेचे जिल्हा प्रमुख अतुल दिवे, शहर प्रमुख विशाल रामटेके, तालुका प्रमुख नितीन कुंभारे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.(प्रतिनिधी)कंपनीत कामगार कायद्यान्वये घोषित सर्व नियम पाळले जात आहेत. वायगाव ते खरांगणा या मार्गावर अत्यल्प कामगार असल्याने ती बस बंद केली आहे. तसेच महिलांना रात्रपाळी सुरू केली असली तरी त्यांना ती बंधनकारक नाही.- डॉ. कैलास सिंघानिया, संचालक, संस्कार अ‍ॅग्रो प्रा.लि. वायगाव (नि.)