शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

मुदत संपलेल्या पदार्थांची दुकानांतून सर्रास विक्री

By admin | Updated: May 3, 2017 00:40 IST

पॅकबंद असलेल्या पदार्थांच्या पाकिटांवर कंपन्यांकडून ‘मॅन्यूफॅक्चर आणि एक्स्पायरी डेट’ लिहिलेली असते.

पुलगाव येथील प्रकार : नागरिकांचे आरोग्य धोक्यात वर्धा : पॅकबंद असलेल्या पदार्थांच्या पाकिटांवर कंपन्यांकडून ‘मॅन्यूफॅक्चर आणि एक्स्पायरी डेट’ लिहिलेली असते. कंपन्यांकडून दिलेल्या मुदतीत या पदार्थांची विक्री करणे बंधनकारक असते; पण पुलगाव शहरातील इंदिरा मार्केट परिसरात असलेल्या एका किराणा दुकानातून मुदत संपलेल्या बहुतांश पदार्थांची सर्रास विक्री केली जात आहे. या प्रकारामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पुलगाव येथील इंदिरा मार्केट येथे समोर असलेल्या किराणा दुकानातून शुक्रवारी एका ग्राहकाने चिमुकल्या मुलांचे पोषक खाद्य असलेले नाचणीचे पॅकेट खरेदी केले. हे पॅकेट संबंधित कंपनीमार्फत ६ जुलै २०१६ रोजी पॅकबंद करण्यात आले तर मुदत ५ नोव्हेंबर २०१६ देण्यात आली होती. यामुळे मागील वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यापर्यंतच सदर पॅकेटची विक्री करणे अनिवार्य होते. यानंतर सदर दुकानदाराला तो माल कंपनीला परत पाठविता आला असता; पण असे न करता नागरिकांचे आरोग्य धोक्यात घालत सदर दुकानदाराकडून २०१७ मध्येही तो माल विकला जात असल्याचे शुक्रवारी दिसून आले. या किराणा दुकानातून अन्य पॅकबंद पदार्थांचीही मुदत संपल्यानंतर सर्रास विक्री होत असल्याची ओरड ग्राहकांकडून करण्यात येत आहे. याच प्रकारामुळे अनेकदा वादही झाले; पण किराणा व्यावसायिक त्यांना दाद देत नसल्याचेच दिसून आले. अनेक ग्राहक माल घेतल्यानंतर वाद घालून अखेर तो परत करतात. या दुकानदाराबाबत अनेक तक्रारी असल्याचेही ग्राहक सांगतात. असे असले तरी अद्याप त्यांच्यावर अन्न व औषधी प्रशासनाद्वारे कारवाई करण्यात आले नसल्याचेच दिसून येते. अन्न व औषधी प्रशासनातील अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.(कार्यालय प्रतिनिधी)