बेपत्ता नवरदेवाचा मृतदेह आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 06:00 AM2020-01-16T06:00:00+5:302020-01-16T06:00:09+5:30

दोन विद्युत मोटारी लावून विहिरीचे संपूर्ण पाणी उपसून काढले. मात्र, विष्णुचा विहिरीत व शेतात इतरत्र कुठेही शोध लागला नाही किंवा मृतदेह आढळला नाही. बुधवार १५ जानेवारीला ज्या जागेवर १० वेळा जावून आले. त्याच ठिकाणी मृतदेह आढळून आल्याने विष्णूच्या मारेकऱ्याने पुरावे नष्ट करण्याचा पुरेपुर प्रयत्न केल्याची चर्चा घटनास्थळी होती.

Missing Navardev's body was found | बेपत्ता नवरदेवाचा मृतदेह आढळला

बेपत्ता नवरदेवाचा मृतदेह आढळला

Next
ठळक मुद्देदुर्गंधीमुळे उजेडात आली घटना : शेतात जातो म्हणून निघाला होता घराबाहेर

लोकमत न्यूज नेटवर्क
साहुर/आष्टी (शहीद) : साहूर येथील विष्णू भगवंत लाड यांचे ८ जानेवारीला लग्न ठरले. लग्नपत्रिकांचे वितरण झाले. अवघ्या दोन दिवसांनी लग्न असताना ६ जानेवारीला शेतात जातो असे सांगून घराबाहेर पडलेल्या विष्णूचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. विष्णूची हत्याच करण्यात आल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे.
बेपत्ता असलेल्या विष्णूचा शोध घेतल्या जात असताना त्याच्याच मालकीच्या शेतात विष्णूचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. कापूस वेचणीचे काम सुरू असताना शेतमजूर महिलांना दुर्गंधी बाबतची माहिती इतरांना दिली. अशातच शेतातील मोहन भोरे व इतरांनी बारकाईने पाहणी केली असता मृतदेह आढळून आला.
सदर मृतदेह कुणाचा याबाबतची चर्चा सुमारे १ तास सुरू असताना विष्णूच्या वडील भगवंत लाड यांना पाचारण करून मृतकाची ओळख पटविण्यात आली. विष्णूची आत्महत्या नसून त्याची हत्याच करण्यात आल्याचा आरोप विष्णूच्या आई-वडिलांसह ग्रामस्थांकडून केला जात आहे. ज्या विहिरीजवळ विष्णूचा मृतदेह आढळून आला. त्या जागेवर व संपूर्ण शेतात घरच्यामंडळीसह गावातील ५० ते १०० लोकांनी शेतातील पºहाटीची एक एक ओळ शोधून काढली. एवढेच नव्हे तर दोन विद्युत मोटारी लावून विहिरीचे संपूर्ण पाणी उपसून काढले. मात्र, विष्णुचा विहिरीत व शेतात इतरत्र कुठेही शोध लागला नाही किंवा मृतदेह आढळला नाही.
बुधवार १५ जानेवारीला ज्या जागेवर १० वेळा जावून आले. त्याच ठिकाणी मृतदेह आढळून आल्याने विष्णूच्या मारेकऱ्याने पुरावे नष्ट करण्याचा पुरेपुर प्रयत्न केल्याची चर्चा घटनास्थळी होती. मनमिसळू स्वभावाचा विष्णू सर्वांशी सौजन्याने राहत होता. सदर घटनेची माहिती मिळताच आष्टी पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेत ताब्यात घेतला. शिवाय पंचनामा करून मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविला. या घटेनची नोंद पोलिसांनी घेतली असून पुढील तपास सुरू आहे.
 

Web Title: Missing Navardev's body was found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून