शहरं
Join us  
Trending Stories
1
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
2
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
3
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
4
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
5
“प्रियंका चोप्रामुळे राघव चड्ढा यांचा भाजपात प्रवेश”; नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीचा मोठा दावा
6
धक्कादायक! नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, तरुणाला अटक
7
Budh Pradosh 2026: कर्जमुक्ती आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी २९ एप्रिलला न चुकता करा 'बुध प्रदोष' व्रत
8
Top Marathi News LIVE Updates: १ मेपासून मराठीची मोहीम सुरूच राहणार; मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
9
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
10
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
11
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
12
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदी सिक्कीमच्या तरुणांसोबत खेळले फुटबॉल, PHOTOS ची रंगली चर्चा
13
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
14
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
15
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
16
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
17
‘RTE’ प्रवेश! पसंतीच्या शाळेसाठी पालकांची कोंडी; ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ, तरीही संभ्रम कायम
18
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
19
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
20
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

नाली बांधकामात सिमेंटचा अत्यल्प वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 05:00 IST

रस्त्याच्या बाजुच्या नाल्या बांधण्याचे काम सुरू आहे. यासाठी वापरल्या जाणाऱ्या बेड काँक्रीटच्या गिट्टीत नाममात्र सिमेंट टाकून ओली गिट्टी नालीत पसरविण्याचे काम केले जात आहे. मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप घोराड येथील नागरिकांनी केला आहे.

ठळक मुद्देहिंगणा-सिरसगाव मार्गाचे काम : घोराडवासीयांची तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : हिंगणा-हिंगणी- घोराड- सेलू, मदनी- अल्लीपूर- कापसी- सिरसगाव या मार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू झाले आहे. १०० कि़मी. लांबीचा हा मार्ग सर्वांसाठी सोयीचा ठरला आहे. या रस्त्याच्या बाजुच्या नाल्या बांधण्याचे काम सुरू आहे. यासाठी वापरल्या जाणाऱ्या बेड काँक्रीटच्या गिट्टीत नाममात्र सिमेंट टाकून ओली गिट्टी नालीत पसरविण्याचे काम केले जात आहे. मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप घोराड येथील नागरिकांनी केला आहे.सदर मार्गाचे रुंदीकरण करुन दोन्ही बाजुला मोठ्या नाल्यांचे बांधकाम सुरू आहे. या नालीसाठी तयार करण्यात येत असलेल्या गिट्टी व सिमेंटच्या मिश्रणात सिमेंट फक्त नावालाच टाकले जाते व ओली गिट्टी सर्रासपणे बेड काँक्रीटला वापरली जात आहे. याबाबत काही गावकऱ्यांनी ही बाब अधिकाºयांच्या लक्षात आणून दिली परंतु कुणी ऐकूण घ्यायला तयार नाही. या मार्गाची लांबी सुमारे शंभर कि़मी. आहे. राज्यशासन व ठेकेदार यांच्या ४० टक्के व ६० टक्के व निधीतून हे काम सुरू आहे. ठेकेदारांकडून प्रचंड गैरप्रकार या बांधकामात सुरू आहे. ठेकेदारावर लक्ष ठेवणारी सार्वजनिक बांधकाम विभागाची यंत्रणा डोळयावर पट्टी बांधुन आले. घोराड गावाजवळ गैरप्रकार सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने गुणनियंत्रण विभागाकडे झालेल्या कामाचे साहित्य खोदून तपासणीसाठी पाठवावे व दोषींवर कारवाई करावी अशी मागणी आहे. या रस्त्याच्या रूंदीकरणासाठी घोराड गावात दोन्ही बाजूने क्रॉक्रींट नाली बांधण्यात आली. ती नाली प्रचंड उंच झाल्याने जुन्या रस्त्यालगतचे घर आता खाली गेले आहे. त्यांना नालीवरून उडी मारून घरात प्रवेश घ्यावा लागत आहे.बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट नाहीनागपूर जिल्ह्यापासून सुरू झालेल्या या रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणावर निकृष्ट बांधकामाबाबत तक्रारी आहेत. पण बांधकाम विभागाचे अधिकारी याकडे लक्ष देत नसल्याचे दिसून येत आहे या कामाला त्यांनी भेट दिली नाही, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली.घोराड जवळ नालीचे बांधकाम सुरू आहे. त्यात गिट्टीमध्ये केवळ नाममात्र सिमेंट वापरुन ओल्या गिट्टीचे बेड कॉक्रींट करणे सुरू आहे.याकडे संबधिताचे दुर्लक्ष होत आहे.-अरविंद तडस, गावकरी, घोराड

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा