शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

खोट्या पावतीवर बाजारात वसुली

By admin | Updated: October 3, 2016 00:41 IST

दैनिक बाजाराचे कंत्राट असलेले नगर पालिकेचे कंत्राटदार शेख इस्माईल यांनी शनिवारी खोट्या पावत्या वापरून नियमबाह्यरीत्या वसुली करण्यात आली.

आम आदमी पार्टीचा आरोप : नगराध्यक्षांकडे कारवाईची मागणीहिंगणघाट : दैनिक बाजाराचे कंत्राट असलेले नगर पालिकेचे कंत्राटदार शेख इस्माईल यांनी शनिवारी खोट्या पावत्या वापरून नियमबाह्यरीत्या वसुली करण्यात आली. झेंडूच्या फुलांची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांकडून प्रत्येकी ४० रुपयांची अवैध वसुली करण्यात आली. यामुळे शेख इस्माईल यांचे कंत्राट रद्द करावे. शेतकरी आणि नगर पालिका यांची खोट्या पावतीने वसुली करीत फसवणूक करणाऱ्या कंत्राटदारावर कलम ४२० अन्वये फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आम आदमी पार्टीने केली. सध्या जिल्ह्यात शेतकऱ्यांची अत्यंत वाईट स्थिती आहे. जिल्ह्यात दर दिवशी दोन याप्रमाणे शेतकरी आत्महत्या होत आहेत. शनिवारी चार शेतकऱ्यांनी आपली १० किलो झेंडूची फुले विक्रीला आणली होती. कृष्णा कातोरे, दादाराव कातोरे, अर्चना कातोरे आणि जयश्री कातोरे सर्व रा. धोत्रा हे कारंजा चौक येथे झेंडूची फुले विकायला बसल होते. दरम्यान, नगर पालिका दैनिक बाजार ठेकेदार शेख इस्माईल यांनी पालिकेचे प्रमाणित न केलेल्या बोगस बुकातून पावती देऊन प्रत्येकी ४० रुपये नियमबाह्यरित्या वसूल केले. शेतकऱ्यांना आपला स्वत:चा माल विकण्याची परवानगी आहे. त्यावर कुठलाही कर लागत नाही. शिवाय केवळ १०० रुपये किमतीच्या झेंडूच्या फुलांवर ४० रुपये कर आकारणे निषेधार्ह आहे. त्यातच नगर पालिकेच्या दैनिक बाजार कंत्राटदाराने खोट्या पावती बुकातून ४० रुपयांच्या चार शेतकऱ्यांच्या पावत्या फाडून सुमारे १६० रुपये हस्तगत केले. यातून त्यांनी शेतकऱ्यांसह नगर पालिकेच्या नावावर वसुली करीत पालिकेची फसवणूक केली आहे.यामुळे नगर पालिका प्रशासनाने दैनिक बाजार ठेकेदार शेख इस्माईल यांचे दैनिक वसुली कंत्राट त्वरित रद्द करावे. त्यांनी शेतकरी आणि नगर पालिकेची फसवणूक केल्याने त्यांच्यावर फसवणुकीबाबत कलम ४२० अन्वये फौजदारी गुन्हा दाखल करावा. शेतकरी शेतातून जो माल विक्रीसाठी आणतात व मजूर पानाची पत्रावळी, फुले, द्रोण, विकतात, चिल्लर लहान दुकानदार यांच्याकडून कर वसूल करण्यात येऊ नये, अशी मागणीही आपने केली आहे. याबाबत नगराध्यक्षांना निवेदनही सादर करण्यात आले.(तालुका प्रतिनिधी)