शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

‘डेंग्यू’ व ‘स्वाईन फ्लू’ आजारांबाबत जनजागृती करा

By admin | Updated: October 16, 2015 03:00 IST

सध्या डेंग्यू, स्वाईन फ्ल्यू आजाराने मोठ्या प्रमाणात रुग्ण बाधित होत आहेत. डेंग्यू हा आजार एडिस इजिप्टाय या डासांपासून होतो. तो विषाणूमुळे होणारा आजार आहे.

जिल्हा आरोग्य अधिकारी : नवदुर्गा उत्सव मंडळांना फलक, बॅनर लावण्याच्या सूचनावर्धा : सध्या डेंग्यू, स्वाईन फ्ल्यू आजाराने मोठ्या प्रमाणात रुग्ण बाधित होत आहेत. डेंग्यू हा आजार एडिस इजिप्टाय या डासांपासून होतो. तो विषाणूमुळे होणारा आजार आहे. डेंग्यू तापाच्या रुग्णाला उपचारास विलंब झाला तर मृत्यू ओढविण्याची शक्यता असते. यामुळे नागरिकांनी वेळीच उपचार घेण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व नवदुर्गा उत्सव मंडळांनी सामाजिक बांधिलकी म्हणून डेंग्यू व स्वाईन फ्ल्यू या आजारांची जनजागृती होईल, असे बॅनर, पोस्टर्स लावावे. हस्तपत्रिका छापून जनजागृती कराव्या, अशा सूचना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. डी.जी. चव्हाण यांनी दिल्यात.जिल्ह्यात सध्या डेंग्यू व स्वाईन फ्लू आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे जरजागृती गरजेची झाली आहे. या आजाराची लक्षणे दिसताच नजीकच्या रुग्णालयात उपचार घेतले पाहिजे. डासांच्या अळ्या नष्ट करा, पाण्याची भांडी आठवड्यातून एकदा घासून कोरडी करा. पाण्याचे डबके साचू देऊ नका. मच्छरदाणीचा वापर करावा, डेंग्यू आजारावर प्रतिबंधात्मक उपाय हाच एकमेव पर्याय असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. स्वाईन फ्लू हा आजार एच.१, एन.१ या विषाणूमुळे होतो. याची लक्षणे ताप, घसादुखी वा घशाला खवखव होणे, नाक गळणे, खोकला, अंगदुखी, डोकेदुखी, क्वचित प्रसंगी उलटी व जुलाब होणे आदी आहेत. लहान बालके, ६५ वर्षांवरील व्यक्ती, गरोदर महिला, हृदयविकार व मूत्रपिंडाचे आजार, मधुमेह, उच्चरक्तदाब आदी आजार असलेल्या व्यक्ती या आजारासाठी अतिजोखमीचे ठरतात. त्यांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. स्वाईन फ्ल्यूची लागण टाळण्यासाठी वारंवार साबणाने व स्वच्छ पाण्याने हात धुवावे. पौष्टीक व सकस आहार घ्यावा. गरम पाण्यात मीठ व हळद टाकून गुळण्या कराव्यात. भरपूर पाणी प्यावे, पुरेशी झोप व विश्रांती घ्यावी. शिंकताना वा खोकलताना नाका तोंडावर रूमाल धरावा. या आजारांपासून दूर राहण्यासाठी धुम्रपान करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, खोकला, सर्दी व ताप असताना गर्दीच्या ठिकाणी जाणे तसेच डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय औषध घेणे टाळावे, असे आवाहनही डॉ. चव्हाण यांनी केले आहे. नवरात्री उत्सवात लंगरकरिता उपयोगात आणलेले प्लास्टिक द्रोण, प्लेट नष्ट कराव्या व परिसर स्वच्छ ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्यात.(कार्यालय प्रतिनिधी)