शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

कालवा पाझरल्याने शेताचे नुकसान

By admin | Updated: May 7, 2017 00:37 IST

पिकांना देण्यासाठी कालव्यामधून सोडण्यात येणारे पाणी सदोष बांधकामामुळे पाझरल्याने शेतात चिखल होत आहे.

बांधकामाला तडा : झुडुपांचा विळखा तर कुठे अर्धवट कामांमुळे नुकसान लोकमत न्यूज नेटवर्क आष्टी (शहीद) : पिकांना देण्यासाठी कालव्यामधून सोडण्यात येणारे पाणी सदोष बांधकामामुळे पाझरल्याने शेतात चिखल होत आहे. याची झळ पिकांना बसत असून शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागत आहे. तालुक्यातील पेठअहमदपूर, परसोडा, खडकी, गोदावरी या चार मौजामधील अवस्था बिकट झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. अप्पर वर्धा धरण विभाग व तालुक्यातील तलावांमधून पिकांसाठी पाणी सोडल्या जाते. पेठअहमदपुर कडून परसोडाकडे जाणाऱ्या कालव्याला जागोजागी तडा गेल्या आहे. अर्धवट बांधकाम झाल्यामुळे कालव्यातून वाहणारे पाणी थेट शेतात साचत आहे. शेतकऱ्यांनी याबाबत कालवे विभागाला अवगत केले तरी दुरुस्ती केली नाही. या पाझरणाऱ्या पाण्यामुळे कालव्याच्या बाजुला गटारगंगा तयार झाली आहे. कालवा आणि शेत याला लागून असलेल्या रस्त्याची यामुळे दुरवस्था निर्माण झाली आहे. बांधकाम करण्यासाठी खोदून ठेवलेल्या कालव्याची अवस्था खराब झाली आहे. गाळ साचला, झाडे-झुडपे वाढली, दगड पडल्याने पाणी सोडण्याचे गेट बंद झाले, अ‍ॅप्रोच मधून पाणी पाझरत आहे. काळ्या मातीमुळे बांधलेला भागही दबत असल्याने कालव्याचे भविष्य संपुष्टात येण्याची शक्यता आहे. शेतीला पाणी मिळावे याच हेतुने कालवे बांधण्यात आले. मात्र गत अनेक वर्षांपासून त्याची दुरुस्ती करण्यात पाटबंधारे विभाग अपयशी ठरले आहे. याबाबत शेतकरी वारंवार तक्रारी करतात. त्यांच्या तक्रारीला केराची टोपली मिळत आहे. आष्टी तलावाद्वारे बांधकाम झालेला कालवा देखील अर्धवट आहे. कालव्यात बाभळीची झाडे वाढली आहे. ती तत्काळ काढून साफसफाई करावी, लिकेज ठिकाणी दुरुस्ती करून शेतात पाणी पाझरणार नाही. शेतकऱ्यांच्या सिंचनासाठीच कालवे व पाटसऱ्या बांधण्यात आल्या. यातील दुरुस्ती व साफसफाई करण्याचे आदेश दिले असून पाणी सोडणारे व सफाई मजुर हे कामात दिरंगाई करीत असल्यास कारवाई करणार - पी.पी. पोटफोडे, कार्यकारी अभियंता पाटबंधारे धरण विभाग अमरावती