शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
4
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
5
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
6
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
7
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
8
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
9
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
10
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
11
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
12
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
13
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
14
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
15
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
पत्र्याच्या शेड उडाल्या, झाडे कोसळली; सावंतवाडीत अवकाळी पावसाने उडवली दाणादाण, मोठ्या प्रमाणात नुकसान
17
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
18
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
19
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
20
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनने हिरावला लघुव्यावसायिकांचा घास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 05:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. दरम्यान तीन महिन्यांच्या कालावधीत ...

ठळक मुद्देअर्थचक्र थांबलेलेच : कुटुंबीयांचे हाल; शासनाकडून आर्थिक मदतीची करताहेत अपेक्षाऑटोचालकांची आर्थिक घडी विस्कटली

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. दरम्यान तीन महिन्यांच्या कालावधीत सारे काही ठप्प पडले होते. जून महिन्यात शासनाने लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणली असली तरी अद्याप मध्यम आणि लघु व्यावसायिकांची आर्थिक घडी पूर्व पदावर आलेली नाही.मागील पाच महिन्यांपासून कलावंत, ऑटो व इतर प्रकारच्या व्यावसायिकांचे कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनने अर्थकारण कोलमडल्याने कंबरडेच मोडले आहे. सर्वच प्रकारच्या लघु व्यावसायिकांतून शासनाकडे आर्थिक मदतीची मागणी होत आहे. ‘लोकमत’ने विविध व्यवसाय करून उदरनिर्वाह करणाऱ्या व्यावसायिकांचा घेतलेला हा मागोवा.ऑटोचालकांची आर्थिक घडी विस्कटलीसेलू : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दीर्घकाळ ऑटोची चाके थांबली. कुटुंबाचे भरणपोषण कसे करावे, हा प्रश्न होता. काही जण समृद्धी महामार्गाच्या कामावर काही जणांनी शेतमजुरी सुरू केली. मात्र ज्यांच्या हाताला कामच मिळाले नाही, त्यांच्या परिवाराचे हाल झाले. आता ऑटो सुरू आहे. मात्र, प्रवासी अत्यंत कमी मिळतात. कधी दोन-तिनशे तर कधी पाच-पन्नासवर समाधान मानावे लागते, अशी भावना ऑटोचालकांनी व्यक्त केली. सेलू-वर्धा, सेलू-वडगाव-झडशी, सेलू-हिंगणी, सेलू-केळझर अशा विविध मार्गावरून सेलू या मुख्य शहरातून ऑटोचा प्रवास प्रवाशांना सोयीचा होता. कोरोना प्रतिबंधक उपाय करताना ऑटो बंद करण्यात आले. सुमारे तीन महिने ऑटो बंद राहिल्याने ऑटोचालकांचे कंबरडेच मोडले.ऑटोचालक संजय मधुकर सोरते म्हणाला, पत्नी, मुलगा व मुलीसह राहतो. ऑटोव्यवसायावरच उपजीविका चालायची. दररोज येणाºया चार-पाचशे रुपयांतून खर्च काढून रोजीरोटी वाचायची. लॉकडाऊनमध्ये तीन महिने ऑटो बंद होता. उत्पन्नाचा स्रोतच बंद झाल्याने कुटुंबीयांना हाल सोसावे लागले, हे शब्दात सांगताना डोळ्यात पाणी येते, असे तो म्हणाला. प्रशांत गोविंद लटारे म्हणाला, अनेक ऑटोचालकाची परिस्थिती बिकट आहे. दररोजच्या धंद्यातून जे वाचेल, त्या पैशावर घर चालायचे, ऑटोमुळे आधार होता. लॉकडाऊनमधील तीन महिने संकटांचा सामना करावा लागला. कोरडं-ओल खाऊन दिवस काढले. तेला मिठाचीही सोय नव्हती, आता ऑटो सुरू झाला, मात्र, प्रवासी नाहीत. तुटपुंज्या मिळकतीवर कुटुंबाचे पोट भरणे सुरू आहे. शशिकांत जर्नादन सावरकर म्हणाला, लॉकडाऊनमध्ये ऑटो बंद झाले. याच काळात विवाह झाला. अत्यंत कठीण परिस्थिती अनुभवली आता चार पैसे येतात. दिवस काढणे सुरू आहे. सरकारने ऑटोचालकांना मासिक पाच हजार रुपये मानधन द्यावे, अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या