शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

पीपीई किट घालून आलेल्या चोरट्याने पळविले रोखसह दागिने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 05:00 IST

सावळापूर येथील यशोधरा अमृत वाकडे व त्यांचे कुटुंबीय झोपले असताना पीपीई किट परिधान करून आलेल्या दोघांनी  त्यांच्या घरात प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी कुठलाही आवाज होऊ न देता घरातील ५ हजारांची रोख रक्कम व दागिने असा एकूण १७ हजारांचा मुद्देमाल चोरला. हा मुद्देमाल घेऊन घटनास्थळावरून पळ काढताना दोघांपैकी एका चोरट्याचा पाय यशोधरा यांना लागला. त्यामुळे त्या खडबडून जाग्या झाल्या व त्यांनी चोर-चोर म्हणत आरडाओरडा केला.

ठळक मुद्देसावळापुरात दहशत : घटनास्थळावरून पळ काढताना तरुणाच्या तोंडावर हाणला दगड

लोकमत न्यूज नेटवर्क देऊरवाडा/आर्वी :  कोविड संकटाच्या काळात पीपीई किटचा वापर कोविड विषाणूपासून बचावासाठी कोविड योद्धा म्हणून काम करणारे करत आहेत. मात्र, असे असले तरी चक्क चोरटेच आता पीपीई किटचा वापर करून चोरी करत असल्याची धक्कादायक बाब आर्वी तालुक्यातील सावळापूर येथे उघडकीस आली आहे. यामुळे सावळापूरसह परिसरात दहशत पसरली आहे.प्राप्त माहितीनुसार, सावळापूर येथील यशोधरा अमृत वाकडे व त्यांचे कुटुंबीय झोपले असताना पीपीई किट परिधान करून आलेल्या दोघांनी  त्यांच्या घरात प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी कुठलाही आवाज होऊ न देता घरातील ५ हजारांची रोख रक्कम व दागिने असा एकूण १७ हजारांचा मुद्देमाल चोरला. हा मुद्देमाल घेऊन घटनास्थळावरून पळ काढताना दोघांपैकी एका चोरट्याचा पाय यशोधरा यांना लागला. त्यामुळे त्या खडबडून जाग्या झाल्या व त्यांनी चोर-चोर म्हणत आरडाओरडा केला. महिलेचा आरडाओरडा ऐकून परिसरातील इतर रहिवासी जागे झाले. याच दरम्यान यशोधरा यांच्या मुलाने मोठे धाडस करत चोरट्यांचा पाठलाग केला. यावेळी एका चोरट्याने रस्त्यावरील दगड उचलून यशोधरा यांच्या मुलाच्या नाकावर मारल्याने तो जखमी झाला. चोरट्यांनी मुद्देमालासह घटनास्थळावरून यशस्वी पळ काढला. याप्रकरणी यशोधरा अमृत वाकडे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.  

ठाणेदारांनी केली घटनास्थळाची पाहणीया घटनेची माहिती मिळताच आर्वीचे ठाणेदार संजय गायकवाड यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. लवकरच या प्रकरणातील चोरट्यांना जेरबंद करू, असे पोलीस सांगत असले तरी या धाडसी चोरीमुळे परिसरात चोरट्यांबाबत कमालीची दहशत निर्माण झाली आहे.फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेतली असून चोरट्यांच्या शोधार्थ पोलिसांच्या दोन चमू रवाना करण्यात आल्याचे खात्रीदायक सूत्रांनी सांगितले.

 

टॅग्स :Thiefचोर