शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
4
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
5
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
6
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
7
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
8
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
9
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
10
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
11
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
12
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
13
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
14
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
15
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
16
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
17
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
18
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
19
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
20
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्याच्या मृत्यूची चौकशी करा - मागणी

By admin | Updated: October 16, 2015 02:59 IST

बोंडसुला येथील मधुकर धोटे यांचा १२ आॅक्टोबर रोजी मृत्यू झाला. डॉक्टरने चुकीचे उपचार केल्याने हा मृत्यू झाल्याचा संशय मृतकाचा भाऊ दिलीप धोटे यांनी व्यक्त केला आहे.

वर्धा : बोंडसुला येथील मधुकर धोटे यांचा १२ आॅक्टोबर रोजी मृत्यू झाला. डॉक्टरने चुकीचे उपचार केल्याने हा मृत्यू झाल्याचा संशय मृतकाचा भाऊ दिलीप धोटे यांनी व्यक्त केला आहे. याबाबत त्यांनी पोलीस अधीक्षक, जि.प. आरोग्य अधिकारी यांना निवेदन सादर करीत चौकशी करण्याची मागणी केली आहे.मधुकर हे सोमवारी बाजारासाठी हमदापूर येथे गेले होते. प्रकृती अस्वस्थ झाल्याने ते डॉ. शंकर लहानुजी कांबळे यांच्या दवाखान्यात गेले. तेथे बोंडसुला येथील अन्य रुग्ण होते. अन्य रुग्णांवर उपचार करीत डॉक्टरने धोटे यांनाही तपासले. यानंतर सायंकाळी ७ वाजता डॉ. कांबळे यांनी ‘तुमचे भाऊ सेवाग्राम येथे मरण पावले’, असा निरोप दिला. सेवाग्राम येथील डॉक्टरांनी मात्र सदर रुग्ण मृतावस्थेत आणला, असे सांगितले. डॉ. कांबळे व दिवाकर देशमुख यांनी बाळू राकडे यांच्या आॅटोने मृत मधुकरला सेवाग्राम रुग्णालयात आणले. प्रकृती गंभीर झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली नाही. आॅटोचालक बालू रोकडे यांनी आॅटोत बसविले तेव्हा मधुकर यांचा चेहरा झाकून होता, असे सांगितले. या बाबी संशयास्पद असल्याने चौकशी करावी, अशी मागणी दिलीप धोटे यांनी केली आहे.(कार्यालय प्रतिनिधी)