शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

वर्धेतील परंपरा जपण्याकरिता पुढाकार

By admin | Updated: May 5, 2017 02:02 IST

शहरात विविध संघटनांद्वारे सामूहिक विवाह सोहळे घेतले जात होते; पण ती परंपरा खंडित झाली.

पत्रकार परिषद : ३१ जोडपी होणार विवाहबद्ध वर्धा : शहरात विविध संघटनांद्वारे सामूहिक विवाह सोहळे घेतले जात होते; पण ती परंपरा खंडित झाली. यामुळे वर्धा मंडप बिछायत, इलेक्ट्रिक डेकोरेशन साऊंड सिस्टिम आणि कॅटरर्स असोसिएशनने सेवा समिती वर्धा स्थापन करीत ही परंपरा कायम राखण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यात ७ मे रोजी शहरातील जुन्या आरटीओ मैदानावर सामूहिक विवाह सोहळा घेण्यात येत असून ३१ जोडपी विवाहबद्ध होणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत राठी यांनी सांगितले. सर्वधर्मिय सामूहिक विवाह सोहळ्याची माहिती देण्याकरिता जुन्या आरटीओ मैदानावर आयोजित पत्रकार परिषदेत ते माहिती देत होते. यावेळी उपाध्यक्ष प्रशांत कोल्हे, सचिव सुनील भोवरे, सहसचिव संजय ठाकरे, कोषाध्यक्ष विजय ठकरे, कॅटरर्स असोसिएशनचे शिवा तरोडकर आदी उपस्थित होते. सर्वधर्मिय सामूहिक विवाह सोहळ्यात अनुसूचित जातीची १९, पाच इतर मागास वर्गीय, एक मुस्लीम आणि सहा आदिवासी जोडपी सहभागी होणार आहेत. विवाहबद्ध होणाऱ्या जोडप्यांना शासनाकडून दहा हजार रुपयांचा धनादेश, सहा हजारांचे डोळ-डोरले, चार हजारांचे भांडे दिले जाणार आहे. शिवाय आयोजकांकडून वधुला साडी, वराचे कपडे, एक ग्रॅम सोन्याची पोत यासह स्वयंपाकाची भांडी देण्यात येणार आहे. सहभागी वरांची वरात बच्छराज धर्मशाळेतून दुपारी ३.३० वाजता निघणार असून शिवाजी चौक, आर्वी नाका चौक येथून जुन्या आरटीओ चौकात पोहोचणार आहे. सायंकाळी ६.३० वाजता विवाह पार पडणार आहे. वर-वधूकडील प्रत्येकी ५० वऱ्हाडी लग्नात सहभागी होणार असून एकूण ८ ते १० हजार लोक उपस्थित राहतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. वऱ्हाड्यांच्या जेवणाची व्यवस्था कॅटरर्स असोसिएशनकडून करण्यात येणार आहे. सोहळ्याची तयारी अंतीम टप्प्यात असून ९० हजार स्क्वेअर फुट जागेत मंडप उभारण्यात आला आहे. सामूहिक विवाह सोहळा पार पाडण्याकरिता संघटनांचे १७५ सदस्य झटत असल्याची माहितीही राठी, कोल्हे, ठाकरे यांनी दिली. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)