शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

गाफिल प्रशासनामुळे वाढतोय कोविड संसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 05:00 IST

जिल्हा बंदी कायम असताना ई-पास आणि चोर वाटांचा अवलंब करून आतापर्यंत लाखाच्यावर व्यक्ती वर्धा जिल्ह्यात परतले आहेत. याच व्यक्तींपैकी बहूतांश व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग होऊन वर्धा जिल्ह्यात कोरोनाचा स्प्रेड झाल्याचे आरोग्य विभागाच्या आतापर्यंतच्या पाहणीत पुढे आले आहे. विना परवानगी कुणी वर्धा जिल्ह्यात येऊ नये म्हणून जिल्ह्याच्या सीमांवर तात्पूत्या पोलीस चौकी तयार करण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देजिल्हाबंदी ठरतेय नावालाच : कोरोना बाधितांच्या संख्येने साडेपाच महिन्यात केला सातशेचा आकडा पार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : लॉकडाऊन जाहीर झाल्यावर सुरूवातीचे ५० दिवस कोविड विषाणूची एन्ट्री न करू दिलेल्या वर्धा जिल्ह्यात सध्या कोरोना आपले पाळेमुळे घट्ट करू पाहत आहे. जिल्हा बंदी कायम असतानाही चोर वाटेने वर्धा जिल्ह्यात अनेक व्यक्ती येत असल्याने कोविडच्या स्प्रेडही वाढत आहे. सध्या कोविड बाधितांची संख्या सातशे पार झाली असून लवकरच हा आकडा हजारी पार करेल असे तज्ज्ञांकडून बोलले जात आहे. परिणामी, नागरिकांनीही आता जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे.जिल्हा बंदी कायम असताना ई-पास आणि चोर वाटांचा अवलंब करून आतापर्यंत लाखाच्यावर व्यक्ती वर्धा जिल्ह्यात परतले आहेत. याच व्यक्तींपैकी बहूतांश व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग होऊन वर्धा जिल्ह्यात कोरोनाचा स्प्रेड झाल्याचे आरोग्य विभागाच्या आतापर्यंतच्या पाहणीत पुढे आले आहे. विना परवानगी कुणी वर्धा जिल्ह्यात येऊ नये म्हणून जिल्ह्याच्या सीमांवर तात्पूत्या पोलीस चौकी तयार करण्यात आल्या आहेत. याच ठिकाणी जिल्ह्यात येणाऱ्यांकडे सक्षम अधिकाऱ्यांकडून देण्यात येणारी ई-पास आहे काय याची तपासणी केली जाते.परंतु, या मार्गाने न येता काही व्यक्ती चोरवाटेने वर्धा जिल्ह्यात प्रवेश करीत असल्याचेही कोविड योद्धा म्हणून काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे वर्धा जिल्ह्यात कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी नव्या जोमाने जिल्हाबंदीची प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.२२,५२३ व्यक्तीची चाचणीट्रेस, टेस्ट आणि ट्रिट या त्रिसुत्री संकल्पनेला केंद्रस्थानी ठेऊन आतापर्यंत जिल्ह्यात एकूण २२ हजार ५२३ व्यक्तींची कोविड चाचणी करण्यात आली आहे. यात जिल्ह्याबाहेरील व्यक्तींचाही समावेश असून त्यापैकी २१ हजार ४६० व्यक्ती अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर १ हजार १२० व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. त्यापैकी ७२२ कोविड बाधित व्यक्ती वर्धा जिल्ह्यातील असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.प्लाझ्मादानासाठी जनजागृती विशेष मोहीम गरजेचीकोरोनामुक्त झालेल्या १८ ते ६० वर्ष वयोगटातील आणि किमान ५५ किलो वजन असलेल्या पुरुषाला २८ दिवसानंतर किमान २०० तर जास्तीत जास्त ५०० एमएल प्लाझ्मादान करता येतो. व्हेंटिलेटरवर असलेल्या कोविड बाधितासाठी प्लाझ्मा थेरपी ही नवसंजीवनी ठरणारी असून प्लाझ्मादानाचे कुठलेही दुष्परिणाम नसल्याचे वैद्यकीय अधिकारी तसेच वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. भविष्यातील भयावह कोरोना संकट लक्षात घेऊन कोविडमुक्त झालेल्या व्यक्तींनी स्वत:हून पुढे येत प्लाझ्मादान करणे गरजेचे असून तसे आवाहनही सेवाग्राम येथील कस्तुरबा हेल्थ सोसायटीच्यावतीने करण्यात आले आहे. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाकडून प्लाझ्मादानाबाबत विशेष जनजागृती मोहीम जिल्ह्यात राबविण्याची गरज आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या