शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
2
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
3
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
4
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
5
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
6
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
7
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
8
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
10
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
11
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
12
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
13
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
14
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
15
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
16
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
17
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
18
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
19
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
20
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमधील अवैध उपक्रम बसला मानगुटीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 05:00 IST

बिबट्याच्या शिकारप्रकरणी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळावर आढळलेल्या पुराव्यावरून सुरुवातीला तिघांना ताब्यात घेत विचारपूस केली. याच विचारपूसदरम्यान ठोस माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या हाती लागल्यानंतर आकोली (हेटी) येथील रहिवासी असलेल्या धनराज सांडे, संजय सोळंकी व अजित राठोड याला ताब्यात घेत विचारपूस करण्यात आली.

ठळक मुद्देबिबट्याची शिकार प्रकरण : उर्वरित जाळेही वनविभागाकडून जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : खरांगणा वनपरिक्षेत्रात येणाऱ्या सुकळी उबार शिवारात रानडुक्कर पकडण्याच्या जाळ्याने बिबट्याची शिकार करण्यात आली. या प्रकरणातील तीन आरोपींना वनविभागाने जेरबंद केले असून भटक्या जमातीतील या तिन्ही आरोपींनी कोरोना पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात शिकारीचा अवैध गोरखधंदा सुरू केला होता, असे वनविभागाच्या आतापर्यंतच्या चौकशीत पुढे आले आहे.बिबट्याच्या शिकारप्रकरणी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळावर आढळलेल्या पुराव्यावरून सुरुवातीला तिघांना ताब्यात घेत विचारपूस केली. याच विचारपूसदरम्यान ठोस माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या हाती लागल्यानंतर आकोली (हेटी) येथील रहिवासी असलेल्या धनराज सांडे, संजय सोळंकी व अजित राठोड याला ताब्यात घेत विचारपूस करण्यात आली. सुरूवातीला उडवाउडवीची उत्तरे देणारे हे तिन्ही संशयित बोलके होत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर या तिन्ही आरोपींना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयात हजर करून त्यांची १५ जूनपर्यंत वनकोठडी मिळविली आहे. आतापर्यंतच्या तपासात वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या आरोपींपासून घटनास्थळावर सापडलेल्या जाळ्याव्यतिरिक्त उर्वरित जाळे जप्त केले आहे. यापूर्वी एक भाला आणि घटनास्थळावरून जाळे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले आहे. हे प्रकरण पुढे कुठले नवीन वळण घेते, याकडे लक्ष लागले आहे.आरोपींची संख्या वाढण्याची शक्यताबिबट्याची शिकार प्रकरणात सध्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तिघांना जेरबंद करून त्यांची वनकोठडी मिळविली असली तरी या प्रकरणात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून वर्तविली जात आहे. आतापर्यंत काही व्यक्तींचे बयानही नोंदविण्यात आले आहे.

टॅग्स :leopardबिबट्या