शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच भडकावू विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
3
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
4
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
5
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
6
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
7
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
8
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
9
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
10
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
11
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
12
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
13
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
14
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
15
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
16
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
17
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
18
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
19
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
20
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
Daily Top 2Weekly Top 5

शेळी पालन व्यवसायासाठी जिल्हा ठरणार ‘आयडल’

By admin | Updated: May 11, 2017 00:40 IST

शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात विविध विशेष उपक्रम राबवून शेतीला पूरक व्यवसायांना प्रोत्साहन देत

बाजारपेठ उपलब्ध होणार : बेरोजगारांना रोजगाराची संधी महेश सायखेडे । लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात विविध विशेष उपक्रम राबवून शेतीला पूरक व्यवसायांना प्रोत्साहन देत शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याचे काम शासनाच्यावतीने केले जात आहे. याच उद्देशाला केंद्रस्थानी ठेऊन जि.प.च्या पशुसंवर्धन विभागाने एक नवीन उपक्रम राबविण्याचे निश्चित केले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेळी पालकांना एकत्रित करून त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. परिणामी, ग्रामीण भागातील अनेक बेरोजगारांच्या हाताला काम मिळणार असल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यात जवळपास १ लाख ६० हजार शेळी आहेत. तसेच शेळीपालकांची संख्याही बऱ्यापैकी आहे; पण सदर शेळी पालकांना जिल्ह्यातच पाहिजे तशी मोठी बाजारपेठ उपलब्ध नसल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील टेंभुर्णा तसेच अमरावती जिल्ह्यातील पोहरा येथे शेळी विकण्याकरिता जावे लागते. शेळी पालकांना जिल्ह्यातच मोठी बाजारपेठ उपलब्ध व्हावी, त्यांना शास्वत दर मिळावा, शेळीपालकांना वेळोवेळी मार्गदर्शन व्हावे या उद्देशाने मागणीनुसार ‘शेळींचा आठवडी बाजार’ या नावाचा विशेष आराखडा जि.प. पशुसंवर्धन विभागाने तयार केला आहे. सदर प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांसह ना. जानकर यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे. या आराखड्यात शेळींचा सुसज्य आठवडी बाजार, शेळी प्रजनन केंद्र व पशुविज्ञान केंद्राचा समावेश आहे. सदर प्रस्ताव पुर्णत्त्वास आल्यानंतर जिल्हा शेळीपालन व्यवसायासाठी ‘आयडल’ ठरणार आहे. एक हजार शेळीपालकांना करायचे आहे एकत्रित जि.प. पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून वरिष्ठांचे सहकार्य घेत आतापर्यंत २५ ते ३० शेळीपालकांना एकत्रित करून तालुकास्तरीय गट तयार करून २५० शेळी पालकांना एकत्रित करण्यात यश आले आहे. एकूण एक हजार शेळी पालकांना एकत्रित करून त्यांना योग्य मार्गदर्शन केले जाणार आहे. त्याचप्रमाणे जिल्हास्तरीय गटही तयार करण्यात येणार आहे. देवळी व सालोड (हि.) चा विचार सुरू जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तयार करण्यात येणाऱ्या शेळींच्या आठवडी बाजारासाठी अद्यापही जागा निश्चित करण्यात आली नसली तरी वर्धा शहरानजीकच्या सालोड (हिरापूर) व देवळी येथे सदर आठवडी बाजार तयार करण्याचे विचाराधिन आहे. जागा निश्चित झाल्यानंतर तेथे शेळींचा आठवडी बाजार, पशु विज्ञान केंद्र व शेळी प्रजनन केंद्र तयार करण्यात येणार आहे. सदर उपक्रमामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बेरोजगारांना रोजगार मिळण्यास मदत होणार आहे. शेळी पालकांना मोठी बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. तो लवकरच वरिष्ठ अधिकाऱ्यांसह मंत्र्यांकडे पाठविण्यात येणार आहे. प्रस्तावास मान्यता मिळताच काम सुरू करण्यात येणार असून वर्धा जिल्हा आयडल ठरणार आहे. - डॉ. सतीश राजू, पशुसंवर्धन अधिकारी, जि.प. वर्धा. ग्रामीण बेरोजगारांना देणार प्रशिक्षण जिल्ह्यात बेरारी प्रजातीची शेळी मोठ्या प्रमाणात आहे. बेरारी, उस्मानाबादी, शिरोही, जमना पाटी, ब्लॅक बॅन्गॉल बारवेरी या शेळींच्या प्रजाती आहेत. तयार करण्यात येणाऱ्या शेळी प्रजनन केंद्रात जि.प. पशुसंवर्धन विभागाच्या सहकार्याने शेळीपालकांची भटकंती होऊ नये म्हणून विविध प्रजातीचे बोकड ठेवण्यात येणार आहे. जागेची निवड झाल्यानंतर तयार करण्यात येणाऱ्या मोठ्या बाजारपेठेमुळे शेळीपालकांना शास्वत दर मिळणार आहे. पशु विज्ञान केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील बेरोजगारांना शेळीपालन व्यवसायाबाबत विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शाश्वत दर मिळणार शेळीपालनाचा व्यवसाय करणारे जिल्ह्यात बऱ्यापैकी असून सध्या जिल्ह्यातील शेळी पालकांना १५० रुपये प्रती किलो प्रमाणे दर मिळतो. तोच दर मोठ्या बाजारपेठेत २१० रुपये प्रती किलोच्या घरात जातो. जिल्ह्यातच मोठी बाजारपेठ उपलब्ध झाल्यास शेळीपालकांचा मोठ्या बाजारपेठेपर्यंत जाण्याचा त्रास कमी होणार असून त्यांना शास्वत दर मिळणार आहे.