शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ मृतदेहाची ओळख पटली

By admin | Updated: June 15, 2014 23:43 IST

कोरा मार्गावर असलेल्या नालीत शनिवारी सायंकाळी एका इसमाचा मृतदेह आढळून आला होता. त्याच्या शरीरावर असलेल्या जखमांवरून वेगवेगळे कयास लावले जात होते. त्या मृतदेहाची ओळख पटली असून

मृत नागपुुरातील : शवविच्छेदन अहवालावर भिस्तगिरड : कोरा मार्गावर असलेल्या नालीत शनिवारी सायंकाळी एका इसमाचा मृतदेह आढळून आला होता. त्याच्या शरीरावर असलेल्या जखमांवरून वेगवेगळे कयास लावले जात होते. त्या मृतदेहाची ओळख पटली असून त्याचे नाव महानंद नारायण भगत (६२) रा. मटकाझरी, ता. उमरेड, जि. नागपूर असे असल्याचे पोलिसांनी सांगितले. हा इसम वेडसर असल्याचे सांगण्यात येत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, ८ जून २०१४ रोजी गिरड टेकडीवर तो कुटुंबासहित नवस फेडण्यासाठी आला होता; परंतु स्वयंपाक सुरू असताना सर्वांची नजर चुकवून तो बेपत्ता झाला. शोधाशोध करूनही तो सापडला नाही. तो सापडत नसल्याने त्याच्या कुटुंबीयांनी बेपत्ता झाल्याची तक्रार गिरड पोलिसांमध्ये ९ जूनला नोंदविली होती. तसेच त्याच्या अंगावर निळ्या रंगाचा जयभिम लिहिलेला दुपट्टा असल्याची खुण सांगितली होती. शनिवारी रात्री तपास करताना ठाणेदार चिंचोळकर यांना मृताजवळ जयभिम लिहिलेला दुपट्टा आढळला. यावरून गिरड पोलिसांनी भगत यांच्या कुटुंबीयांना सदर माहिती दिली. भगत कुटुुंबीयांनी गिरड पोलीस ठाणे गाठले. मृतदेह तपासणीअंती तो महानंद भगत याचाच असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर हिंगणघाट येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह गिरड येथील स्मशानभूमीत दफन करण्यात आला. महानंद हा वेडसर असल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले. तसेच बेपत्ता झाल्यानंतर तो अनेकांना गिरड कोरा रस्त्यावर फिरतांना दिसला होता; परंतु त्याच्या मृत्यूचे ठोस कारण अद्याप कळू शकले नाही. त्याचा मृत्यू उष्माघाताने झाला असावा असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल असे सांगितले. घटनेचा तपास ठाणेदार ओमकांत चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार शंकर भलावी, वामन घोडे, संजय चाटे, नागोसे, भांडारकर करीत आहेत.(वार्ताहर)