शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालयाचा कारभार आरोग्य केंद्रातूनच

By admin | Updated: October 29, 2014 22:53 IST

ग्रामीण भागातील नागरिकांना सुलभ आरोग्यसेवा मोफत मिळावी म्हणून शासनाने गाव तेथे दवाखाना धोरण राबविले़ १९८४ मध्ये शहीदभूमीला तालुक्याचा दर्जा मिळाल्यावर शासनाने प्राथमिक

बांधकाम अंतिम टप्प्यात : पदभरती अद्याप झालीच नाही; ग्रामीण रुग्णालय केवळ नावापुरतेचआष्टी (श़) : ग्रामीण भागातील नागरिकांना सुलभ आरोग्यसेवा मोफत मिळावी म्हणून शासनाने गाव तेथे दवाखाना धोरण राबविले़ १९८४ मध्ये शहीदभूमीला तालुक्याचा दर्जा मिळाल्यावर शासनाने प्राथमिक आरोग्य केंद्राचा दर्जा दिला़ लोकसंखा वाढल्याने तब्बल २४ वर्षांनी २००९ मध्ये ग्रामीण रूग्णालयाचा दर्जा देण्यात आला़ यासाठी ३ कोटी १५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. बांधकामही ८० टक्के पूर्ण झाले; पण शासनाने अद्याप कर्मचारी व अधिकाऱ्यांची पदभरती केली नाही. यामुळे ग्रामीण रुग्णालय नावापुरतेच काय, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत़ २००९ मध्ये तत्कालीन आमदार अमर काळे यांनी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याकडे पाठपुरावा करून ३५ खाटेचे ग्रामीण रुग्णालय मंजूर करून घेतले. यानंतर नियोजित जागेवरून वाद झाल्याने माजी आमदार दादाराव केचे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जागेवरच ग्रामीण रुग्णालय हवे, अशी मागणी लावून धरली. येथे आजी-माजी आमदारांच्या वादात जनतेची मुस्कटदाबी झाली. शेवटी आ. काळे यांनी जनतेवरच निर्णय सोपवून वादातून माघार घेतली व केचे यांनी त्याच ठिकाणी बांधकाम करायला लावले. सदर जागा आठवडी बाजार, ग्रामपंचायत, शाळा याला लागून असल्याने भविष्यात रोगराई पसरण्याची भीती व्यक्त होत होती़ इमारत बांधकामाचा आगडोंब सोडला तर शासनाने ग्रामीण रुग्णालयाप्रती अनास्थेचे धोरण स्वीकारल्याचेच दिसून आले़आरोग्य उपसंचालक नागपूर, जिल्हा शल्यचिकित्सक वर्धा यांनी वारंवार पत्रव्यवहार करून पदभरती करण्याची मागणी केली़ त्यासाठी बृहत आराखडा मंजूर झाला होता; पण काही ठिकाणी राजकारण आडवे आल्याने ही समस्या आजही कायम आहे़ तालुक्याची लोकसंख्या ५० हजारांच्या वर आहे. एकट्या आष्टी, नवीन आष्टी, पेठअहमदपूर या तीनही गावांची मिळून लोकसंख्या २२ हजार आहे. अशावेळी ग्रामीण रुग्णालय नसणे ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. रोगराई वाढली आहे. डेंग्यू, गॅस्टोची साथ सतत वाढत आहे. रुग्णतपासणी करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांची दोन्ही पदे रिक्त आहेत़ तालुका आरोगय अधिकारी पदही रिक्त आहे. रुग्णालय म्हटले की केवळ सुसज्ज इमारत असून चालत नाही. त्यासाठी डॉक्टर, परिचारिका, यंत्र, औषधीसाठा असणे आवश्यक आहे. या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून शासनाने त्वरित ग्रामीण रुग्णालयात कर्मचारी, अधिकाऱ्यांची पदभरती करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.(प्रतिनिधी)