शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
4
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
6
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
7
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
8
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
9
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
10
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
11
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
12
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
13
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
14
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
15
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
16
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
17
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
18
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
19
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
20
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाची धास्ती;भक्तांनी फिरवली मंदिराकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 06:00 IST

जगभर कोरोनाची धास्ती आहे. गर्दी टाळण्यासाठी संचारबंदी लागू केल्याने अनेक नागरिक घरीच देवपूजा करुन कोरोना आजाराचे संकट टळू दे अशी प्रार्थणा नागरीक करीत आहे. ज्या मारोतीच्या मंदिरावर शनिवारी गर्दी व्हायची, आता त्याही संकटमोचनाच्या मंदिरावर कुणीच दिसत नाही. गावातील अनेक नागरिक मंदीराच्या पारावर गप्पा गोष्टी करायचे, तो मंदीराचा पार ही शांत झाला आहे.

ठळक मुद्देअनेक मंदिर कुलूपबंद : मंदिर परिसरातील दुकानदारावरही बेरोजगारीचे सावट

लोकमत न्यूज नेटवर्कविरूळ (आकाजी) : रोज ज्या मंदीरात पूजा व्हायची, देवाळतल्या मूर्तींची आंघोळ व्हायची, ज्या मंदीरातील रोज घंटानाद होऊन आरती केली जायची, ती मंदिरे गेल्या आठवड्यापासून ओस पडलेली आहे. एकही भाविक या मंदिराकडे फिरकत नसून मंदिरेही कुलूपबंद करण्यात आली आहे.कोरोना विषाणूच्या धास्तीने परिसरातील ग्रामीण भागातीलही अनेक मंदिर कुलूप बंद आहे. मंदिर कुलूपबंद असल्यामुळे भक्तमंडळी मंदीराकडे जातांना दिसत नाही. सध्या हे भयानक वास्तव अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. इतका शुकशुकाट व मंदिर बंद करण्याची वेळ परिसरातील नागरिकांनी कधीही अनुभवली नाही, असे वृद्ध मंडळी सांगत आहे. संकटाच्या वेळी देवाचे नाव घेणारे व मंदीराचा दरवाजा ठोठावणारे आपण पाहिले. परंतु कोरोना आजाराच्या धास्तीने मंदिर बंद पडल्याने देवळातील मूर्ती सुध्दा ऐकटी पडली आहे.जगभर कोरोनाची धास्ती आहे. गर्दी टाळण्यासाठी संचारबंदी लागू केल्याने अनेक नागरिक घरीच देवपूजा करुन कोरोना आजाराचे संकट टळू दे अशी प्रार्थणा नागरीक करीत आहे. ज्या मारोतीच्या मंदिरावर शनिवारी गर्दी व्हायची, आता त्याही संकटमोचनाच्या मंदिरावर कुणीच दिसत नाही. गावातील अनेक नागरिक मंदीराच्या पारावर गप्पा गोष्टी करायचे, तो मंदीराचा पार ही शांत झाला आहे. कधी नव्हे ऐवढ्या भीषण परिस्थितीला नागरिक समोर जातांना दिसत आहे.कोरोना आजाराच्या धास्तीने अनेकांचे रोजगार हिरावला आहे. कंपन्या, शेतीचे कामे, दुकान बंद पडल्याने रोजगार बंद पडला आहे. अनेक गरिबांच्या घरची परिस्थिती हातावर आणने व पानावर खाण्यासारखी आहे. सर्वच कामे बंद पडल्याने व रोजगार नसल्याने अनेकांचे दोन वेळचे जेवणाचे वांदे झाले आहे. या परीसरात समृध्दी महामार्गाच्या कामासाठी अनेक परप्रांतीय मजूर या परिसरात दाखल झाले आहे. अनेक कुटूंब वास्तव्यास आहे. कोरोनाच्या प्रभावामुळे समृद्धी महामार्गाचे काम करणाऱ्या अ‍ॅफकॉन कंपनीने काम बंद केल्याने अनेक परप्रांतीय मजूर बेरोजगार झाले आहे. त्यांच्या हाताला काम नाही कंपनीने कामाच्या दिलेल्या पैशात त्याचा संसार चालविला जात आहे. हातातील पैसा संपल्यावर काय करायचे, काय खायचे, लेकराबाळांचे पोट कसे भरायचे हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. हे मजूर विरुळ व रसुलाबाद गावात येऊन काम मागत आहे. कामेच नसल्याने व सर्व व्यवहार ठप्प झाल्याने त्यांना काम तरी कसे द्यायचे ही समस्या आहे. म्हणून त्यांची या संचारबंदीच्या काळातही मजुरीकरिता भटकंती सुरु असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसTempleमंदिर