शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

खाऊच्या पैशातून चिमुकल्यांची ‘त्या’ शेतकरी कुटुंबाला मदत

By admin | Updated: October 15, 2015 02:27 IST

येथील शेतकरी गुणवंत नारायण झोटींग यांनी नापिकी व वाढत्या कर्जाला कंटाळून ५ आॅक्टोबरला आत्महत्या केली. यानंतर सदर शेतकरी कुटुंब दोन दिवस उपाशी होते.

वायगाव (नि.) : येथील शेतकरी गुणवंत नारायण झोटींग यांनी नापिकी व वाढत्या कर्जाला कंटाळून ५ आॅक्टोबरला आत्महत्या केली. यानंतर सदर शेतकरी कुटुंब दोन दिवस उपाशी होते. त्यांच्या कुटुंबियांकडे कुणी लक्ष देत नव्हते. हे विदारक वास्तव ‘लोकमत’ने ९ आॅक्टोबर उजेडात आणले व त्या कुटुंबाला मदतीचा ओघ सुरू झाला. बुधवारी तर चिमुकल्यांनी खाऊच्या पैशातून त्या कुटुंबाला मदत करीत आदर्शच घालून दिला.वृत्त उमटल्यानंतर अधिकारी, नेते यांनी भेट देण्यात सुरूवात केली व मदत केली. वर्धा येथील काही नि:स्वार्थी समाजसेवकांनी या कुटुंबाला मदतीचा हात दिला. काही नेत्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या मुलाच्या रोजगाराची हमी घेत ग्वाही दिली. लक्ष्मीनगर तिवारी ले-आऊट वर्धा येथील प्राजक्ता सिडाम, प्रणिता सिडाम, प्रसाद कोडगीरवार व अभिषेक होले या चार चिमुकल्यांनीही हे वृत्त वाचल्यानंतर आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला मदत करण्याचे ठरविले. दु:खद परिस्थिती लक्षात घेत या चार चिमुकल्यांनी स्वत:च्या खाऊचे पैसे तसेच पोलीस क्वॉर्टर, लक्ष्मीनगर, तिवारी ले-आऊट वर्धा आदी भागात फिरून काही रक्कम गोळा केली. या चिमुकल्यांनी स्वत:सह ५० लहान मित्रांचे खाऊचे पैसे गोळा केले. यात एकूण २ हजार ६०० रुपये गोळा झाले. या विद्यार्थ्यांनी प्रथम तहसीलदार राहुल सारंग यांची भेट घेत त्यांना माहिती दिली. यानंतर वायगाव गाठून सरपंच, तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रा.पं. सदस्य आणि पालकांच्या उपस्थितीत ही मदत झोटींग कुटुंबीयांच्या स्वाधीन केली. शेतकऱ्यांच्या विदारक स्थितीची जाण ठेवून या विद्यार्थ्यांनी स्वत:चे खाऊचे पैसे तसेच परिसरात फिरून काही रक्कम जमा केली. विद्यार्थ्यांचा समाजभान जपणारा हा उपक्रम आदर्शच ठरणारा आहे. तहसीलदार सारंग यांनीही या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.(वार्ताहर)