शहरं
Join us  
Trending Stories
1
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
2
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
3
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
4
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
7
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
8
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
9
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
10
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
11
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
12
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
13
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
14
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
15
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
16
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
17
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
18
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
19
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
20
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगापुढे होणार सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 22:24 IST

राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाच्या खंडपीठापुढे बालक हक्क उल्लंघनासंदर्भातील तक्रारीवर १९ जुलैला सुनावणी होणार आहे. गडचिरोली येथे आयोजित या सुनावणीत नागपूर विभागातील सर्वच जिल्ह्यातील प्रकरणे पटलावर राहणार आहेत. यामध्ये वर्ध्यातून दोन प्रकरणे खंडपीठापुढे सादर केली जाणार आहे.

ठळक मुद्दे१९ ला गडचिरोलीत बैठक : जिल्ह्यातील दोन प्रकरणे पटलावर

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाच्या खंडपीठापुढे बालक हक्क उल्लंघनासंदर्भातील तक्रारीवर १९ जुलैला सुनावणी होणार आहे. गडचिरोली येथे आयोजित या सुनावणीत नागपूर विभागातील सर्वच जिल्ह्यातील प्रकरणे पटलावर राहणार आहेत. यामध्ये वर्ध्यातून दोन प्रकरणे खंडपीठापुढे सादर केली जाणार आहे.बालकांच्या हक्कासंदर्भात कठोर पावले उचलत त्यांना न्याय मिळवून देण्याकरिता पूर्व आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. १९ जुलै रोजी गडचिरोली येथे होणाऱ्या राष्ट्रीय बाल अधिकार सरंक्षण आयोगाच्या खंडपीठाच्या बैठकीस बालक, पालक, आई-वडील, बालकाचे पालकत्व स्वीकारणाऱ्यांनी किंवा इतर व्यक्तींनी तक्रारीसह उपस्थित राहण्यासंबंधी निर्देशही जिल्हाधिकाºयांनी दिले. वर्ध्यातही जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी पोलीस विभाग, शाळाबाह्य मुले, कुपोषित बालके, स्थलांतरित बालके, बालमृत्यू तसेच चाईल्डलाईन फाऊंडेशनच्या हेल्पलाईनवर आलेल्या बालकांच्या तक्रारींचा आढावा घेतला. आतापर्यंत दोन तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यातील एक तक्रार आरटीई प्रवेशासंदर्भातील असून दुसरी तक्रार चाईल्डलाईनमार्फत आलेली आहे. या दोन्ही तक्रारी बैठकीच्या पटलावर राहणार आहे. या बैठकीला नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यातील अतिरिक्त जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकारी, जिल्हा बाल कल्याण कक्ष अधिकारी, पोलीस अधिकारी, कामगार अधिकारी, बाल कल्याण समितीचे अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी व चाईल्डलाईनचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहे.या तक्रारींचा आहे समावेशतक्रारीचे प्रकार बाल कामगारांचे निर्मूलन किंवा तणावग्रस्त बालके, बाल न्याय किवा दुर्लक्षित, अपंग, बालकांच्या काळजीबाबत, अ‍ॅसिड हल्ला, भिक्षा मागणे, बालकांचे गैरवर्तन किंवा दुर्लक्ष बालकांच्या काळजी घेणा-या संस्था, बालकांची खरेदी विक्री, बालकांचा मृत्यू, अपहरण, हरविलेले बालक, खून, आत्महत्या, माध्यमांद्वारे नियमांचे व बाल अधिकारांचे उल्लंघन, शिक्षण बालकाच्या संबंधित कायदा, बालकाचे आरोग्य, काळजी, कल्याण आणि विकास, बाल मानसशास्त्र इत्यादी तक्रारींचा समावेश असणार आहे.बालकाच्या हक्क उल्लंघनाच्या तक्रारी जास्तीत जास्त प्राप्त व्हाव्यात यासाठी ग्रामपंचायत, बालगृहे, शाळा, अंगणवाडी, निवासी बाल वसतीगृह येथे चाईल्डलाईनचा हेल्पलाईन क्रमांक सूचना फलकावर दर्शवून जनजागृती करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहे.-विवेक भिमनवार,जिल्हाधिकारी, वर्धा