शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

बनावट एनए तयार करणाऱ्या गोरखनाथला अटक

By admin | Updated: December 23, 2016 01:49 IST

येथील भूमाफिया सतीश नरहरशेट्टीवार याच्या प्रकरणात दररोज एक नवा आरोपी समोर येत आहे.

नरहरशेट्टीवार प्रकरणात आरोपींची संख्या चारवर वर्धा : येथील भूमाफिया सतीश नरहरशेट्टीवार याच्या प्रकरणात दररोज एक नवा आरोपी समोर येत आहे. नरहरशेट्टीवार याने विकलेल्या ले-आऊटचे एनए बनावट असल्याचे समोर येताच पोलिसांनी गुरुवारी ते एनए तयार करणाऱ्यालाही ताब्यात घेतले. त्याचे नाव गोरखनाथ चौधरी असे असल्याचे सांगण्यात आले आहे. एनए तयार करण्याच्या व्यवहारावरून त्याच्या नावे ले-आऊट विक्री केल्याचेही तपासात समोर येत आहे. या प्रकरणात आपले नाव येणार असल्याचा अनेकांना अंदाज आल्याने त्यांनी अटकपूर्व जामीन मिळविण्याकरिता न्यायालयात धाव घेतल्याचे समोर आले आहे. यात एक तलाठी न्यायालयात गेला असून त्याच्या याचिकेवर सुनावणी होणे बाकी असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. या तलाठ्यावर सावंगी पोलिसांचे विशेष लक्ष असून तो हाती येताच काही ना काही नवे प्रकरण समोर येणार असल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे पोलिसांचे लक्ष या तलाठ्यावर असल्याची चर्चा पोलीस विभागात आहे. पोलिसांनी बुधवारी अटकेतील सेवानिवृत्त तलाठी नरेश उघडे याच्या घराची झडती घेतली. यात अनेक संशयास्पद कागदपत्रे हाती आली. यातूनच बनावट एनए तयार करणाऱ्याचा सुगावा लागला. यावरून चौधरीला अटक करण्यात आली आहे. त्याला अटक केल्यानंतर गुरुवारी रात्री त्याच्या घराचीही झडती पोलिसांकडून घेण्यात आली. झडतीची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याने पोलिसांना चौधरी याच्या घरात काय सापडले याची माहिती मिळू शकली नाही. या प्रकरणात सतीश नरहरशेट्टीवार याच्या पत्नीचा सुगावा पोलिसांना लागल्याची चर्चा आहे. या प्रकरणात आणखी किती आरोपी होतात, याकडे वर्धेकरांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी) मुंबईतून उचलले ४९ लाखांचे कर्ज ४एकाच भुखंडावरून चार बँकांना गंडा घालणाऱ्या नरहरशेट्टीवार याने मुंबईतून उचललेल्या कर्जाची माहिती घेण्याकरिता गेलेली पोलिसांची चमू परत आली आहे. या चमूने तिथे केलेल्या तपासानुसार एकूण ४९ लाख रुपयांचे कर्ज उचलल्याचे समोर आले आहे.