शहरं
Join us  
Trending Stories
1
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
2
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
3
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
4
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
5
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
6
‘प्रतिस्पर्धी नको, आपण भागीदार बनू; व्यापार युद्धात कोणीच विजयी नसतो’, शी जिनपिंग यांच्या ट्रम्प यांना कानपिचक्या
7
जावेद जाफ़रीच्या पत्नीची १७.५ कोटींची फसवणूक: वादग्रस्त महापालिका सहायक आयुक्त पाटीलसह साथीदारांविरुद्ध गुन्हा; पटेलला अटक
8
महाराष्ट्रात काटकसर सुरू! अधिकारी आठवड्यातून किमान १ दिवस फिरणार रेल्वे, बसने
9
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
10
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
11
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
12
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
13
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
14
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
15
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
16
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
17
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
18
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
19
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
20
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
Daily Top 2Weekly Top 5

दहावीतही मुलींचीच आघाडी

By admin | Updated: June 7, 2016 07:40 IST

बारावीच्या निकालानंतर सर्वांना दहावीच्या निकालाची प्रतीक्षा लागली होती. सर्वांच्या प्रतीक्षेत असलेला माध्यमिक

वर्धा : बारावीच्या निकालानंतर सर्वांना दहावीच्या निकालाची प्रतीक्षा लागली होती. सर्वांच्या प्रतीक्षेत असलेला माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल सोमवारी दुपारी १ वाजता आॅनलाईन जाहीर झाला. जिल्ह्याचा निकाल ८२.३० टक्के लागला. हा निकाल नागपूर विभागात सर्वात कमी आहे. असे असले तरी जिल्ह्यात बारावीप्रमाणे मुलींनीच आघाडी घेतल्याचे टक्केवारीवरून दिसून येते. मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८६.२६ तर मुलांची टक्केवारी ७८.४८ आहे.
जिल्ह्यात जाहीर झालेल्या निकालात भरत ज्ञान मंदिरम्ची सुरूची प्रकाश विष्णू हीने ९८.४० टक्के गुण घेत जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे. तिने ५०० पैकी ४९२ गुण घेतले आहे. तर जिल्ह्यातून दुसरा येण्याचा मान अग्रगामी हायस्कूल येथील आदित्य डोकवाल याने पटकाविला आहे. त्याने ५०० पैकी ४९० गुण म्हणजेच ९८ टक्के घेतले आहे. तो जिल्ह्यात मुलांमधून पहिला ठरला. तर तिसऱ्या क्रमांकावर दोन मुली आहेत. त्यांनी प्रत्येकी ९७.६० टक्के गुण घेतले आहेत. यात हिंमतसिंगका विद्यालयाची प्राजक्ता गोपाल बावनकर व अग्रगामी हायस्कूल येथील नेत्रा विजय कडू या दोघांचा समावेश आहे. दोघींनीही प्रत्येकी ५०० पैकी ४८८ गुण घेतले आहेत.
दहावीच्या परीक्षेकरिता जिल्ह्यातील २६९ शाळांमधून एकूण १९ हजार ३०५ विद्यार्थ्यांनी परीक्षेचा निकाल दिला. त्यापैकी १९ हजार २३१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १५ हजार ८३० विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. जिल्ह्यातील १८ शाळांनी १०० टक्के निकाल दिला. जिल्ह्यात सर्वाधिक निकाल वर्धा तालुक्याने दिला असून त्याची टक्केवारी ८६.२४ इतकी आहे. तर सर्वात कमी निकाल आर्वी तालुक्याने दिला आहे. त्याची टक्केवारी ७५.७७ टक्के आहे.
जिल्ह्यातून ९ हजार ८४५ मुले व ९ हजार ४६० मुलींनी परीक्षेचा अर्ज भरला होता. त्यापैकी ९ हजार ८०० मुले व ९ हजार ४३५ मुलांनी परीक्षा दिली. यात ७ हजार ६९१ मुले तर ८ हजार १३९ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.

सुरूचीला व्हायचंय प्रशासकीय अधिकारी
४जिल्ह्यातून प्रथम आलेल्या सुरूचीला प्रशासकीय सेवेत जायचे आहे. अभ्याससह सुरू चीने खेळातही प्राविण्य मिळविलेले आहे. ती बॉल बॅडमिंटनची राष्ट्रीय खेळाडू आहे. नियमित अभ्यास आणि शिकवणी वर्गातून मिळणारे मार्गदर्शन हा तिचा यशाचा मंत्रा असल्याचे सुरूची सांगते. सुरूचीचे वडील महालक्ष्मी स्टील प्लांटमध्ये अभियंता आहे तर आई सरोज या गृहिणी आहे. सुरूचीची मोठी बहीण प्रतिज्ञा फॅशन डिझाईनिंगमध्ये पदवीचे शिक्षण घेत आहे. नर्सरीपासून सुरूचीने कधी पहिला नंबर गमावला नाही. असे तिचे पालक सांगतात. वेळोवेळी आई-वडिलांकडून प्रोत्साहन मिळत असल्याने आज हे यश मिळविता आल्याचे सुरूची म्हणते.

क्रीडांच्या गुणांसह कुशल कांबळेला ९९ टक्के
४न्यू इंग्लिश हायस्कूल येथील कॉन्व्हेंटचा कुशल कांबळे याने ९९ टक्के गुण घेतले आहे. त्याने परीक्षेत ४७५ गुण घेतले तर त्यात २० टक्के गुण खेळाचे मिळविल्यास त्याचे ९९ टक्के होत आहे. या गुणानुसार तो जिल्ह्यातून पहिला ठरत आहे.
४कुशल हा मूळचा अमरावती जिल्ह्यातील धामणगाव तालुक्यातील झाडा येथील आहे. तो शिक्षणाकरिता वर्धेतील न्यू इंग्लिश हायस्कूलच्या कॉन्व्हेंटमध्ये दाखल झाला. त्याने राष्ट्रीय स्तरावर खेळात सहभाग नोंदविल्याने त्याला अतिरिक्त २० गुण मिळाले आहेत.

१८ शाळांचा निकाल १०० टक्के
४दहावीच्या निकालात वर्धा जिल्हा नागपूर विभागात सर्वात कमी निकाल देणार जिल्हा म्हणून नोंद झाली आहे. असे असले तरी जिल्ह्यातील १८ शाळांनी १०० टक्के निकाल दिला आहे.

३,२०२ विद्यार्थ्यांना प्राविण्य
४दहावीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. यात १५ हजार ८३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यापैकी ३ हजार २०२ विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत आले आहेत.
४या व्यतिरिक्त पहिल्या श्रेणीत ६ हजार २३० आणि द्वितीय श्रेणीत ५ हजार ४०४ मुले आहेत. निव्वळ पास श्रेणीत ९९४ मुले आहेत.