शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
3
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
4
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
5
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
9
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
10
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
11
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
12
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
13
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
14
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
15
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
16
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
17
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
18
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
19
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
20
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
Daily Top 2Weekly Top 5

गावागावांत भरतोय जुगाऱ्यांचा ‘पोळा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2021 05:00 IST

शहरात काही पॉश घरात जुगार खेळला जात आहे. येथे प्रतिष्ठांचा वावर दिवसरात्र आहे. पोलिसांना याबाबत माहिती असूनही छापेमारी केली जात नाही, हा मोठा प्रश्न आहे. लहान जुगारांवर किरकोळ कारवाई केली जाते.  सेलू येथील काही आलीशान घरांतही नागपूर येथील काही जुगारी महागड्या वाहनांनी जुगार खेळण्यास येतात. याबाबत पोलिसांना माहिती असतानाही त्यांच्याकडून कारवाई करण्यास टाळाटाळ केल्या जात असल्याचे परिसरातील नागरिकांकडून बोलल्या जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा :  पोळा सण अगदी सहा दिवसांवर येऊन ठेपला आहे. शहरी व ग्रामीण भागात जुगाऱ्यांचा ‘पोळा’ भरत आहे. विविध ठिकाणी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. मात्र, तरीही नाममात्र कारवाई  करण्यावरच पोलिसांचा जोर दिसून येत आहे. पोळा शेतकऱ्यांचा सण असला, तरी त्या पार्श्वभूमीवर जुगाराला अक्षरश: उधाण येते. गावागावांत  जुगार खेळला जातो. हायप्राेफाइल जुगारअड्डे वर्षभर चालतात. आता सुरू असलेल्या जुगारावर लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी जीर्ण घर, सामसूम शेतशिवारात जुगाऱ्यांचा वावर वाढत चालला आहे. तीन पत्तींचा एक डाव हजारोंचा राहत आहे. नुकताच आर्वी, शहर, रामनगर पोलिसांनी जुगार अड्ड्यांवर छापे मारून हजारोंची रक्कम जप्त केली. ग्रामीण पोलिसांकडूनही छापेमारी केली जात आहे. रोकड जास्त असताना, नाममात्र दोन हजारांच्या आतच रक्कम दाखविल्या जात असल्याचे चित्र आहे.शहरात काही पॉश घरात जुगार खेळला जात आहे. येथे प्रतिष्ठांचा वावर दिवसरात्र आहे. पोलिसांना याबाबत माहिती असूनही छापेमारी केली जात नाही, हा मोठा प्रश्न आहे. लहान जुगारांवर किरकोळ कारवाई केली जाते.  सेलू येथील काही आलीशान घरांतही नागपूर येथील काही जुगारी महागड्या वाहनांनी जुगार खेळण्यास येतात. याबाबत पोलिसांना माहिती असतानाही त्यांच्याकडून कारवाई करण्यास टाळाटाळ केल्या जात असल्याचे परिसरातील नागरिकांकडून बोलल्या जात आहे.

प्रतिष्ठित कर्जबाजारी हायप्राेफाइल जुगार अड्ड्यावर जाऊन खेळणारे अनेक प्रतिष्ठित कर्जबाजारी झालेले आहेत. नशीब साथ देईल, म्हणून व्याजाने पैसा आणला जात आहे. जुगारात खेळलेली रक्कम परत काढण्यासाठी हा खटाटोप सुरू आहे. मात्र, कर्जाचा डोंगर वाढत चालल्याने, अनेकांवर मालमत्ता विक्रीची वेळ आली आहे.

सोशल क्लबचा आडोसा सोशल क्लबचा आडोसा घेऊन जिल्हा व परप्रांतातील व्यक्तींनी अड्डे सुरू केलेले आहेत. येथे सर्वच प्रकारच्या सुविधा मिळत असल्याने, जुगार खेळणारे सोशल क्लबला पसंती देत आहेत. दिवसाला लाखो रुपयांची उलाढाल असताना, अलीकडच्या दिवसांत पोलिसांनी छापेमारी केल्याचे दिसत नाही. 

 

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी