शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

निम्न वर्धा प्रकल्पाचा कालवा अर्धवटच

By admin | Updated: October 16, 2016 01:51 IST

धनोडी (बहाद्दरपूर) येथे वर्धा नदीवर निम्न वर्धा प्रकल्प उभारण्यात आला. या प्रकल्पाच्या कालव्याचे काम निधी अभावी रखडले आहे.

निधीची चणचण : देखभाल, दुरूस्तीच्या कामांचाही खोळंबावर्धा : धनोडी (बहाद्दरपूर) येथे वर्धा नदीवर निम्न वर्धा प्रकल्प उभारण्यात आला. या प्रकल्पाच्या कालव्याचे काम निधी अभावी रखडले आहे. ही कामे जलदगतीने पूर्ण करण्याची ग्वाही शासनाकडून देण्यात आली; पण अद्याप निधीच नसल्याने कामाला प्रारंभच झाला नाही. परिणामी, अद्याप कालवा अर्धवट असून पूर्ण झालेल्या कालव्याच्या देखभाल, दुरूस्तीकडेही दुर्लक्ष केले जात असल्याचेच दिसून येत आहे. वर्धा, अमरावती व यवतमाळ या तीन जिल्ह्यांना वरदान ठरणारा निम्न वर्धा प्रकल्प पूर्णत्वास आला; पण अद्याप कालव्याचे काम पूर्ण न झाल्याने तो कुचकामी ठरत आहे. २५ वर्षांतही शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पाणी पाहोचत नसल्याने सिंचनाचे स्वप्न धूसर झाल्याचेच चित्र आहे. निम्न वर्धा प्रकल्पाला मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांनी भेटी दिल्या. त्यावेळी निधी देत कामे पूर्ण करण्याची ग्वाहीही देण्यात आली; पण अद्याप कुठल्याच हालचाली झाल्या नाहीत. यामुळे कालवा पूर्ण होणार की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. निम्न वर्धा कालवे विभागाने याकडे लक्ष देत निधीसाठी पाठपुरावा करणे गरजेचे आहे.(कार्यालय प्रतिनिधी)गेटवर चोरट्यांची वक्रदृष्टीगुंजखेडा परिसरात मुख्य डाव्या कालव्याला गेट बसविण्यात आले आहेत. या कालव्याची देखभाल, दुरूस्तीच केली जात नसल्याने दयनीय अवस्था आहे. शिवाय गेटवरही चोरट्यांची वक्रदृष्टी असल्याचे दिसते. यामुळे ते चोरीला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. कालवे विभागाने याकडे लक्ष देत देखभाल, दुरूस्ती करणे गरजेचे झाले आहे.