शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

अन् मध्यरात्री ग्रीनसीटी हॉटेलमधून उठले आगीचे लोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 05:00 IST

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, शुभम मांडवगडे याच्या मालकीचे कारला बायपास रस्त्यालगत ग्रीन सिटी हॉटेल आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हॉटेल मागील काही दिवसांपासून बंदच आहे. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास हॉटेलमध्ये अचानक आग लागली. हॉटेलमधून आगीचे लोळ उठू लागले. तितक्यातच हॉटेलमध्ये असलेल्या सिलिंडरचा स्फोट झाला अन् आगीने रौद्र रूप धारण केले. पाहता पाहता आगीचे लोळ उठू लागले. 

ठळक मुद्देसिलिंडरच्या स्फोटात साहित्य जळून खाक : पाच लाखांच्या नुकसानाचा पोलिसांनी वर्तविला अंदाज

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा :  वेळ मध्यरात्री २ वाजताची... रस्ते निर्मनुष्य... अन् अचानक आकाशात आगीचे उठणारे लोळ... हे पाहून नागरिकांनाही धक्का बसला. कारला बायपास रस्त्यालगत असलेल्या ग्रीनसीटी हॉटेलमध्ये लागलेल्या आगीत सिलिंडरचा स्फोट झाला अन् हॉटेलमधील सर्व साहित्य जळून कोळसा झाला. ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, शुभम मांडवगडे याच्या मालकीचे कारला बायपास रस्त्यालगत ग्रीन सिटी हॉटेल आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हॉटेल मागील काही दिवसांपासून बंदच आहे. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास हॉटेलमध्ये अचानक आग लागली. हॉटेलमधून आगीचे लोळ उठू लागले. तितक्यातच हॉटेलमध्ये असलेल्या सिलिंडरचा स्फोट झाला अन् आगीने रौद्र रूप धारण केले. पाहता पाहता आगीचे लोळ उठू लागले. दरम्यान, एका सुजाण नागरिकाला धूर दिसल्याने त्याने बाहेर येऊन पाहिले असता, हॉटेल जळत होते. त्याने तात्काळ याची माहिती रामनगर पोलिसांना दिली. सहायक पोलीस निरीक्षक मिश्रा, संदीप खरात, राहुल दुधकोहळे, संतोष कुकडकर, राजू अकाली घटनास्थळी पोहोचले. नगरपालिकेच्या दोन अग्निशमन बंबाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन बंबाच्या साहाय्याने आगीवर पाण्याचा मारा करण्यात आला. अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. रविवारी सकाळी रामनगर पोलिसांनी नुकसानाचा पंचनामा केला. दरम्यान, शॉर्टसर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला असून, लागलेल्या आगीत हॉटेलमालक शुभम मांडवगडे याचे सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती रामनगर पोलिसांनी दिली.  पुढील तपास रामनगर पोलीस ठाण्याचे एपीआय मिश्रा करीत आहेत. 

 

टॅग्स :fireआग