शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

गिमाटेक्सच्या कपडा विभागात भीषण आग; ९० लाखांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 05:00 IST

कंपनीच्या कापड विभागात अचानक आग लागल्याचे लक्षात येताच सुरुवातीला कामगारांनी उपलब्ध असलेल्या उपकरणांचा वापर करून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. परंतु, बघता-बघता आगीने रौद्र रूप धारण केल्याने कामगारांचे प्रयत्न अपयशी ठरले. दरम्यान, आग लागल्याची माहिती हिंगणघाट आणि देवळी येथील पालिकेच्या अग्निशमन विभागाला देण्यात आली.

ठळक मुद्देपरिस्थितीवर मिळविले वेळीच नियंत्रण

हिंगणघाट : स्थानिक गिमाटेक्स इंडस्ट्रीज प्रा. लि. वणी येथील कपडा विभागात अचानक आग लागली. यात या विभागातील विविध साहित्यांसह कापड जळून कोळसा झाल्याने सुमारे ९० लाखांचे नुकसान झाले आहे. आग लागल्याचे लक्षात येताच अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. अग्निशमन विभागाच्या जवानांनी आगीवर पाण्याचा मारा करून घटनास्थळ गाठून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.कंपनीच्या कापड विभागात अचानक आग लागल्याचे लक्षात येताच सुरुवातीला कामगारांनी उपलब्ध असलेल्या उपकरणांचा वापर करून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. परंतु, बघता-बघता आगीने रौद्र रूप धारण केल्याने कामगारांचे प्रयत्न अपयशी ठरले. दरम्यान, आग लागल्याची माहिती हिंगणघाट आणि देवळी येथील पालिकेच्या अग्निशमन विभागाला देण्यात आली. माहिती मिळताच या दोन्ही पालिकेचा अग्निशमन बंब घटनास्थळी पोहोचला. दरम्यान, हिंगणघाट पोलिसांनीही घटनास्थळ गाठले. घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर पाण्याचा मारा करून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. या घटनेची नोंद हिंगणघाट पोलिसांनी घेतली आहे.  

शॉर्टसर्कीट ठरले आगीस कारणीभूतशॉर्टसर्कीटमुळे ही आग लागल्याचे बोलले जात असून आगीत सायझिंग मशीनरी, सूत, कच्चा माल, इलेक्ट्रीक केबल आदी साहित्याचा जळून कोळसा झाल्याने कंपनी प्रशासनाचे सुमारे ९० लाखांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.

 

टॅग्स :fireआग