शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी तारण योजनेचा लाभ घ्यावा

By admin | Updated: September 14, 2015 02:10 IST

शेतमाल काढण्याचा हंगाम येताच बाजारात शेतमालाच्या किंमती पडतात. यामुळे शेतकरी त्यांच्याकडील उत्पादन व्यापाऱ्यांना कमी दरात देत असतात.

 बाजार समितीकडून कर्जाकरिता चार कोटी रुपयांची व्यवस्था हिंगणघाट : शेतमाल काढण्याचा हंगाम येताच बाजारात शेतमालाच्या किंमती पडतात. यामुळे शेतकरी त्यांच्याकडील उत्पादन व्यापाऱ्यांना कमी दरात देत असतात. यात शेतकऱ्यांना मोठी आर्थिक हाणी सहन करावी लागते. याच शेतमालाची साठवणूक करून काही कालावधीनंतर बाजारपेठेत विक्रीसाठी आणल्यास त्या शेतमालाची किंमत वाढलेली असते. यामुळे शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने सुरू असलेल्या तारण योजनेचा लाभ घ्यावा असे समितीचे सभापती अ‍ॅड. सुधीर कोठरी यांनी कळविले आहे. ही योजना मोठ्या प्रमाणात राबविण्याच्या दृष्टीने समितीमार्फत ४ कोटी रुपयांच्या तारण कर्ज प्रस्ताव कृषी पणन मंडळास सादर केला आहे. या योजनेत मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे कळविले आहे. यावेळी संचालकांची उपस्थिती होती.समितीमार्फत गत १५-२० वर्षांपासून सोयाबीन, तूर, चना, गहू व हळद या शेतमालाकरिता तारण योजना राबविली जाते. सदर योजना कृषी पणन मंडळाच्या शर्थी व अटीस अधीन राहून बाजार समितीमार्फत राबविण्यात येत आहे. दिवसाचे बाजार भाव विचारात घेत तारण ठेवलेल्या शेतमालाची किंमत ही तत्कालीन बाजार भाव किंवा शासनाने जाहीर केलेली किंमत यापैकी जी कमी असेल ती ठरविण्यात येईल. या योजनेंतर्गत दिलेल्या कर्जाचा भरणा १८० दिवसाच्या आत करणे आवश्यक आहे. समितीच्या गोदामात फक्त सोयाबीन व शेतमालाची साठवणूक केल्या जाते. यामुळे शेतकऱ्यांनी आर्थिक गरजेपोटी शेतीमालाचा काढणी हंगामात मिळेल त्या भावात शेतमाल विकण्यापेक्षा वखार महामंडळाच्या गोदामात शेतमालाची साफसफाई करून साठवणूक करावी.(तालुका प्रतिनिधी)