शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी समृद्ध झाला पाहिजे

By admin | Updated: May 7, 2017 00:40 IST

मागील दोन वर्षांत राज्यात भाजपा सरकारने अनेक विकासात्मक योजना हाती घेतल्या आहे.

देवेंद्र फडणवीस : आर्वी शहर स्वच्छ करण्याचा संकल्प लोकमत न्यूज नेटवर्क आर्वी : मागील दोन वर्षांत राज्यात भाजपा सरकारने अनेक विकासात्मक योजना हाती घेतल्या आहे. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पादन व मार्केट वाढविण्याच्या दृष्टीने सरकारचे सकारात्मक पाऊल राहणार आहे. शेतकरी उत्पादन वाढवून समृद्ध झाला पाहिजे, हाच विचार घेऊन आमची वाटचाल सुरू आहे, असे मत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. शुकवारी पं.स. सभागृहातील आढावा बैठकीनंतर माजी आमदार दादाराव केचे यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांना मुख्यमंत्री फडणवीस संबोधित करीत होते. ते पुढे म्हणाले की, दोन वर्षांत शेतकरी संकटात सापडला; पण यावर्षी महाराष्ट्रात बारा टक्के उत्पादन वाढून ४० हजार कोटीने शेतपिकांचे उत्पादन वाढले आहे. पुढच्या अडीच वर्षांत शेतकऱ्यांचे उत्पादन कसे वाढविता येईल व शेती सुक्ष्म सिंचनातून कशी विकसित करता येईल, याबाबत ठोस पावले उचलणे सुरू आहे. आतापर्यंत शासनाने शहर स्वच्छ करण्यासाठी २१ हजार कोटी रुपये दिले. शहर स्वच्छ झाले तर रोजगार वाढतील. त्यासाठी आर्वी पालिकेने सर्वप्रथम शहर स्वच्छ करणे, सांडपाण्याचे काम व त्या पाण्याचे नियोजन या कामांना प्रथम प्राधान्य द्यावे, ते अग्रक्रमाने करण्यात येईल, असेही सांगितले. आर्वी तालुक्यातील उपसा सिंचन योजनेतून तयार झालेल्या सुक्ष्म सिंचन प्रकल्पातून शेतकऱ्यांच्या ९ हजार एकर शेताला सिंचन होऊन उत्पादन वाढेल, असा आशावादही फडणवीस यांनी व्यक्त केला. माजी आमदार केचे यांनी आर्वी तालुक्यातील निम्न वर्धा प्रकल्पाची समस्या, आर्वीत एमआयडीसीची गरज व इतर समस्या मुख्यमंत्र्यांनी मार्गी लावाव्या, असे सांगत आर्वी शहरासाठी मुख्यमंत्र्यांनी मोठ्या प्रमाणात विकास निधी दिल्याचा उल्लेख केला. यावेळी खा. रामदास तडस, माजी खासदार विजय मुडे, आर्वीचे नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे, जि.प. समाज कल्याण सभापती निता गजाम, सोनाली कलोडे मुकेश भिसे, कांचन नांदुरकर, युवराज ढोल, सुरेश खवशी, आर्वी न.प. उपाध्यक्ष पल्लवी काळे, वसंत भांगे, मुकूंद बारंगे, दाऊदी बोहरा व मुस्लीम समाजाचे पदाधिकारी, आर्वी, आष्टी, कारंजा तालुक्यातील जि.प., पं.स. व नगर पंचायत सदस्य, तालुक्याचे भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन करीत उपस्थितांचे आभार गजानन भोरे यांनी केले. यावेळी मुख्यमंत्र्यांना निम्न वर्धा प्रकल्पग्रस्त समिती, सर्कसपूर ग्रामस्थ, अंशकालीन कर्मचारी संघटना, निंबोली (शेंडे) येथील प्रकल्पग्रस्तांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देत समस्यांबाबत अवगत केले. कार्यकर्त्यांचाही घेतला आढावा आढावा बैठकीनंतर माजी आमदार केचे यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. याप्रसंगी आपले सरकार शेतकऱ्यांसाठीच काम करणार असल्याचे सांगत भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनीही शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत त्या पोहोचविण्याचे आवाहन केले. आर्वी, आष्टी, कारंजा या तीनही तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी हजर होते. आर्वी उपविभागातील कारंजा येथील नगर पंचायतीला विकास कामांसाठी तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आर्वी विधानसभा संघाचे आ. अमर काळे यांनी केली. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करीत राष्ट्रीय महामार्गावरील शहर आणि नगर पंचायत झालेले कारंजा विकास कामात कसे मागे राहिले, हे समजावून सांगितले. याप्रसंगी कारंजा शहरासह आर्वी विधानसभा मतदार संघातील विविध समस्यांबाबत चर्चा केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व बाबी ऐकून घेत विकास कामांसाठी निधी कमी पडणार नसल्याची ग्वाही दिली.