शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी मदतीचे १.८९ कोटी प्राप्त

By admin | Updated: August 9, 2015 02:14 IST

तालुक्यात रबी हंगामात झालेली गारपीट व वादळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होेते.

आर्वी : तालुक्यात रबी हंगामात झालेली गारपीट व वादळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होेते. या नुकसाननीकरिता शासनाच्यावतीने मदत जाहीर झाली होती. त्याचा पहिला टप्पा मिळाल्यानंतर त्याचा लाभ २ हजार १८७ शेतकऱ्यांना मिळाला. उर्वरीत शेतकऱ्यांकरिता आवश्यक असलेली १ कोटी ८८ लाख ९५ हजार ७५० रुपयांचा दुसरा हप्ता तालुक्याला मिळाला आहे. २०१५ च्या फेब्रुवारी महिन्यात रब्बी हंगामात झालेल्या तालुक्यातील गारपीट व वादळी पावसाच्या तडाख्याने शेत पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्या शेत पिकांच्या नुकसानीची सानुग्रह मदत म्हणून महसूल विभागाच्या सर्वेक्षणानुसार २ कोटी ८४ लाख ९७ हजार ७५० रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी ९६ लाख रुपये मिळाले होता. उर्वरीत अनुदानाचा दुसरा टप्पा १ कोटी ८८ लाख ९५ हजार ७५० रुपये १ आॅगस्ट रोजी प्राप्त झाला आहे. या दुसऱ्या टप्प्यात तालुक्यातील पाच हजार शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.गत तीन वर्षांपासून तालुक्यात अवकाळी पावसाच्या थैमानाने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यात शासनाच्यावतीने शेतकऱ्यांना मदत स्वरूपात हेक्टरी नुकसान भरपाई अनुदान प्राप्त झाले. यात दुसऱ्या टप्प्यात उर्वरित शेतकऱ्यांना नुकसानीच्या अनुदानाची रक्कम देण्यात येणार आहे. ही अनुदानाची रक्कम संबंधित व शेतकऱ्यांच्या खात्यात थेट बँक खात्याद्वारे जमा करण्यात येणार आहे. यात कृषी विभाग व महसूल विभागाच्यावतीने लाभार्थी शेतकऱ्यांची यादी बँकेला पाठवून ती रक्कम शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. हे अनुदान महसूल मंडळ निहाय लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या तयार करून त्यांना बँकेमार्फत तातडीने अनुदानाची रक्कम देण्यात येणार आहे. असे असले तरी बँक खात्यात रक्कम जमा होण्यास विलंब लागत असल्याची ओरड आहे.(तालुका प्रतिनिधी)