पशुपालनाकडे शेतकऱ्यांचा कल वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 06:00 AM2020-01-19T06:00:00+5:302020-01-19T06:00:19+5:30

पशुप्रदर्शनामध्ये सहभागी झालेल्या जनावरांमधून उत्कृष्ट प्रतीच्या जनावरांची निवड करण्याकरिता डॉ. संजय अंदुरकर, डॉ. नितीन फुके, डॉ. मनोज पाटील, डॉ. काळे यांच्या चार सदस्यीय तज्ज्ञ निवड समितीची स्थापना करण्यात आली होती. जनावरांची विभागणी गवळाऊ वळू, गवळाऊ कालवड आणि गवळाऊ गाय, अशा तीन विविध गटांमध्ये करून स्पर्धा घेण्यात आली.

Farmers' attitude towards livestock increased | पशुपालनाकडे शेतकऱ्यांचा कल वाढला

पशुपालनाकडे शेतकऱ्यांचा कल वाढला

Next
ठळक मुद्देसंडे अँकर । दादाराव केचे, स्पर्धेत १ लाख ११ हजारांच्या पुरस्कारांचे वितरण

लोकमत न्यूज नेटवर्क
खरांगणा (मो.) : गवळाऊ पशुपालकांना प्रोत्साहित करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून सातत्याने काम केले जात आहे. त्यामुळे पशुपालकांचा पशु पालनाकडे कल वाढलेला आहे, असे प्रतिपादन आर्वीचे आमदार दादाराव केचे यांनी केले. वर्धा जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत आर्वी पंचायत समितीच्या पुढाकारातून जातिवंत गवळाऊ जनावरांचे प्रदर्शन व दुग्ध स्पर्धा खरांगणा येथे आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
पशुप्रदर्शन आणि गवळाऊ दुग्ध स्पर्धेत एकूण १ लाख ११ हजार रुपयांचे बक्षीस पशुपालकांना वितरित करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सरिता गाखरे यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून दादाराव केचे, जि.प. उपाध्यक्ष वैशाली येरावार, मावळत्या सभापती नीता गजाम यांच्यासह प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ. किशोर कुंभरे, आर्वी पंचायत समितीचे सभापती हनुमंत चरडे, जि.प. सदस्य विनोद लाखे, सुनीता चांदुरकर, ज्योती निकम, उज्व्जला देशमुख, अर्चना टोणपे, सुकेशनी धनवीज, पं.स. सदस्य नितीन अरबट, बाबाराव अवथळे, खरांगणाच्या सरपंच ज्नीलिमा अक्कलवार, वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती पांडुरंग देशमुख, गजानन निकम, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. राजीव भोजने, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रज्ञा डायगव्हाणे-गुल्हाणे आदी उपस्थित होते.
पशुप्रदर्शनामध्ये सहभागी झालेल्या जनावरांमधून उत्कृष्ट प्रतीच्या जनावरांची निवड करण्याकरिता डॉ. संजय अंदुरकर, डॉ. नितीन फुके, डॉ. मनोज पाटील, डॉ. काळे यांच्या चार सदस्यीय तज्ज्ञ निवड समितीची स्थापना करण्यात आली होती. जनावरांची विभागणी गवळाऊ वळू, गवळाऊ कालवड आणि गवळाऊ गाय, अशा तीन विविध गटांमध्ये करून स्पर्धा घेण्यात आली. या निवड समितीने प्रत्येक जनावरांचे सखोल परीक्षण करून त्यामधील उत्कृष्ट नऊ जनावरांची निवड केली.

Web Title: Farmers' attitude towards livestock increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.