शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
4
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
5
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
6
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
7
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
8
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
9
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
10
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
11
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
12
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
13
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
14
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
15
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
पत्र्याच्या शेड उडाल्या, झाडे कोसळली; सावंतवाडीत अवकाळी पावसाने उडवली दाणादाण, मोठ्या प्रमाणात नुकसान
17
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
18
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
19
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
20
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
Daily Top 2Weekly Top 5

देवी अंगात आणणाऱ्या महिलेचा भंडाफोड

By admin | Updated: September 24, 2014 23:39 IST

शहरातील म्हाडा कॉलनी जवळील चिंतामणीनगर येथील एका घरी दरबार सुरू असलेल्या देवीचा महाराष्ट्र अंनिसने भंडाफोड केला़ यात कुटुंबीयांनी विनवणी करून माफी मागितल्याने जादुटोणा विरोधी

महाराष्ट्र अंनिसची कारवाई : फसवणूक न करण्याची दिली ग्वाहीवर्धा : शहरातील म्हाडा कॉलनी जवळील चिंतामणीनगर येथील एका घरी दरबार सुरू असलेल्या देवीचा महाराष्ट्र अंनिसने भंडाफोड केला़ यात कुटुंबीयांनी विनवणी करून माफी मागितल्याने जादुटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला नाही़चिंतामणीनगर येथील पंढरी माने (नाव बदलले) यांच्या घरी येऊन आशा दिनकर मारबते (५०) रा़ घुईखेडा ता. चांदूर बाजार जि. अमरावती ही महिला अंगात देवी येते असे सांगून दरबार भरवित होती़ सदर दरबार सुरू असताना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन भंडाफोड केला़ चिंतामणीनगर येथील कुटुंबाची आशा दिनकर मारबते या महिलेशी जवळीक झाली़ ही महिला घुईखेड येथे दरबार भरवून अंगात देवी आल्याचे भासवून अनेकांना फसवित होती. काही वाईट करण्याचा धाक दाखवित होती. सदर कुटूंब अनेकदा अडचणीत या महिलेच्या दरबारी जात होते़ सहा महिन्यांपूर्वी नोकरी गेल्याने या देवीच्या नादी लागले; पण घरची महिला विरोध करीत होती. पती व कुटुंब या देवीच्या मतानुसार वागत होते़ याचा त्रास या घरच्या महिलेला होत होता. तिने अनेकदा या देवीचा भंडाफोड करण्याचा प्रयत्न केला. यात मासिक पाळीत या देवीचा प्रभाव असल्याने सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. काही दिवसांपूर्वी ही देवी वर्धा मुक्कामी दरबार भरविण्यासाठी या कुटुंबाच्या घरी येणार आहे. तिचा खोटेपणा सर्वांसमक्ष यावा, अशी विनंती गजेंद्र सुरकार यांच्याकडे करण्यात आली़ यावरून या ढोंगी देवीचा मंगळवारी दुपारी १२़३० वाजता भंडाफोड करण्यात आला़यावेळी नकली ग्राहक बनून समितीची कार्यकर्ता श्रेया गोडे गेली़ सदर कार्यकर्ता विधवा असताना तिने लग्न जुळत नाही, असे खोटे सांगितले. यावरून देवीने तिला ओळखले नाही. याच वेळी गजेंद्र सुरकार यांनी अन्य साथीदारांसह पोहोचून अंनिसचे कार्यकर्ते येणार, हे तुला कसे कळले नाही, खरच देवी असेल तर नोटेवरचा नंबर सांग, २१ लाख रुपये मिळेल, असे आव्हान दिले. यावर देवी बोलली नाही. पोलीस व जादुटोणा विरोधी कायद्याचा धाक दाखवताच चूक कबुल करून कान पकडून माफी मागितली. भंडाफोडचे पूर्ण चित्रिकरण कार्यकर्त्यांद्वारे करण्यात आले़ या मोहिमेत सारिका डेहनकर, श्रेया गोडे, जिल्हाध्यक्ष डॉ. सिद्धार्थ बुटले, अनिल मुरडीव, राजेंद्र ढोबळे, सुधाकर मिसाळ, प्रकाश कांबले, भरत कोकावार, नरेंद्र कांबळे, दीपक बारापात्रे यांनी सहभाग घेतला. याप्रसंगी मार्गदर्शन करण्यात आले़(कार्यालय प्रतिनिधी)