शहरं
Join us  
Trending Stories
1
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
2
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
3
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
4
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
5
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
6
‘प्रतिस्पर्धी नको, आपण भागीदार बनू; व्यापार युद्धात कोणीच विजयी नसतो’, शी जिनपिंग यांच्या ट्रम्प यांना कानपिचक्या
7
जावेद जाफ़रीच्या पत्नीची १७.५ कोटींची फसवणूक: वादग्रस्त महापालिका सहायक आयुक्त पाटीलसह साथीदारांविरुद्ध गुन्हा; पटेलला अटक
8
महाराष्ट्रात काटकसर सुरू! अधिकारी आठवड्यातून किमान १ दिवस फिरणार रेल्वे, बसने
9
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
10
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
11
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
12
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
13
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
14
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
15
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
16
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
17
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
18
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
19
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
20
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
Daily Top 2Weekly Top 5

स्वत:च्या व कुटुंबाच्या आरोग्यासाठी प्रत्येकाने ‘नो व्हेईकल डे’ पाळावा!

By admin | Updated: December 22, 2015 02:58 IST

वर्धेकरांनी दर गुरुवारी ‘नो व्हेईकल डे’ पाळण्याचा केलेला निर्धार स्वागतार्ह आहे. प्रत्येक नागरिकांनी स्वत:सह कुटुंबाच्या व

वर्धा : वर्धेकरांनी दर गुरुवारी ‘नो व्हेईकल डे’ पाळण्याचा केलेला निर्धार स्वागतार्ह आहे. प्रत्येक नागरिकांनी स्वत:सह कुटुंबाच्या व शहराच्या आरोग्यासाठी हा दिवस नियमितपणे पाळावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी वर्धेकरांना सोमवारी केले. या उपक्रमात शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीही स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे, अशी आशही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
पर्यावरण आणि वर्धेकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने ‘लोकमत’ने ‘नो व्हेईकल डे’साठी सातत्याने पाठपुरावा केला. रविवारी ३२ च्यावर संघटनांच्या पदाधिकारी व सदस्यांनी हा उपक्रम राबिवण्यासाठी प्रत्येक आठवड्याचा ‘गुरुवार’ या दिवसाची निवड केली. या उपक्रमाला वर्धेतील सर्व स्तरातून वाढता उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. जिल्हा प्रशासनानेही या उपक्रमात सहभागी व्हावे, याबाबतचा प्रस्ताव आम्ही वर्धेकरचे संजय इंगळे तिगावकर, नाट्यदिग्दर्शक हरीश इथापे आणि वैद्यकीय जनजागृती मंचचे डॉ. सचिन पावडे यांनी आज जिल्हाधिकारी आशुतोष सलील, पोलीस अधीक्षक अंकित गोयल आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मीणा यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या समक्ष ठेवला. या प्रस्तावाचे तिनही अधिकाऱ्यांनी स्वागत करून ‘लोकमत’च्या या उपक्रमाचे स्वागत करीत आपणही यंत्रणेसह या उपक्रमात सहभागी असल्याचे सांगितले. या उपक्रमासाठी आवश्यक ती मदतही करण्याचे ते म्हणाले. नागरिकांनीही हा उपक्रम आपल्यासाठी आहे हे गृहीत धरुन यामध्ये दर गुरुवारी सहभागी व्हावे, आणि हा दिवस साजरा करून वर्धेकरांनी इतरही जिल्ह्यांपुढे आदर्श ठेवावा, असे आवाहनही या अधिकाऱ्यांनी यावेळी केले.(जिल्हा प्रतिनिधी)