शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

सतत बदलत्या वातावरणाचा फळ उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 05:00 IST

जिल्ह्यात सुमारे साडे सात हजार हेक्टर क्षेत्र फळबागाखाली आहे. आर्वी  उपविभागात सर्वाधिक संत्रा, मोसंबी, लिंबू , केळी, पपई याचे उत्पादन घेतले जाते. पण सध्या जिल्ह्यात दिवसेंदिवस पार घसरत आहे. या थंडीच्या दिवसातील वातावरणाचा संत्रा, मोसंबी, पपई पिकाला फटका बसत आहे. आर्वी तालुक्यातील हिवरा गावात शंभर हेक्टर संत्रा  बागायत आहे. थंडीमुळे डिंक्या रोगाचा प्रादुर्भाव संत्रा पिकावर दिसून येत आहे. त्यामुळे संत्राची झाडे मुळासकट पूर्णपणे वाळल्यागत दिसत आहे.

ठळक मुद्देसंत्रा, मोसंबी, पपई उत्पादकांच्या अडचणीत भर : कृषीविभाग मात्र सुस्तच

राजेश सोळंकी    लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी/देऊरवाडा : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात गारवा वाढत आहे. तर आर्वी उपविभागात काही भागात ढगाळी वातावरण कायम आहे. याचा फटका फळबागांवर दिसून येत असून फळ उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.जिल्ह्यात सुमारे साडे सात हजार हेक्टर क्षेत्र फळबागाखाली आहे. आर्वी  उपविभागात सर्वाधिक संत्रा, मोसंबी, लिंबू , केळी, पपई याचे उत्पादन घेतले जाते. पण सध्या जिल्ह्यात दिवसेंदिवस पार घसरत आहे. या थंडीच्या दिवसातील वातावरणाचा संत्रा, मोसंबी, पपई पिकाला फटका बसत आहे. आर्वी तालुक्यातील हिवरा गावात शंभर हेक्टर संत्रा  बागायत आहे. थंडीमुळे डिंक्या रोगाचा प्रादुर्भाव संत्रा पिकावर दिसून येत आहे. त्यामुळे संत्राची झाडे मुळासकट पूर्णपणे वाळल्यागत दिसत आहे. तर आर्वी उपविभागातील कारंजा तालुक्यातील जसापूर येथे थंडीमुळे पपई पिकावर विपरित परिणाम दिसून येत आहेत. पपईच्या झाडांमध्ये अन्नद्रव्याची कमतरता दिसून येत आहे. अशातच बुरशी आणि मावाचा प्रादुर्भाव या पिकावर दिसून येत आहे. आंबीया बहराचा संत्राही यंदाच्या वर्षी शेतकऱ्यांना विकता आला नाही. तो झाडावरूनच गळून पडला. 

तीन एकरात पपईची लागवड केली. वाढत्या थंडीचा पिकावर परिणाम होत आहेत. बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव पिकावर दिसून येत आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.- किशोर बंनगरे, फळ उत्पादक, जसापूर.

सततच्या पावसामुळे फळगळ झाली. तर सध्या थंडीमुळे डिंक्या, कोळशी आदी रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे फळगळ होण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे.- गौरव ठाकरे, फळ उत्पादक,            हिवरा तांडा. 

सहा महिन्यांपासून फळबागांवर परिणाम मदतीची प्रतीक्षामागील सहा महिन्यांपासून संत्रा पिकावर तपकीरी रॅाट या रोगांचा प्रादुर्भाव झाला होता. यावेळी मोठ्या प्रमाणावर फळगळती झाली. त्यामुळे त्यावेळी संत्रा उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसला. आता  वाढत्या थंडीमुळे पुन्हा डिंक्या रोग आहे.डिक्या रोगापासून बचाव करण्यासाठी चुना आणि मोरचुद यांचे मिश्रण करून झाडाला लावावे कृषी विभागाने केले आहे. थंडीमुळे फळगळती होते. तसेच फुलगळतात. आर्वी उपविभागात संत्रा, मोसंबी आणि पपई या पिकांवर याचा परिणाम दिसून येत आहे.सततच्या रोग प्रार्दुभावामुळे संत्रा उत्पादकांनी लावलेला खर्चही यंदा निघणे कठीण झाले आहे. रोहणा येथील शेतकऱ्याला लागलेले पैसेही मिळालेले नाही, अशी माहिती या हवालदिल शेतकऱ्याने सांगितले.

 

टॅग्स :Farmerशेतकरीweatherहवामान