अखेर क्रीडा, सांस्कृतिक महोत्सवाचा मुहूर्त ठरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 05:00 IST2020-03-04T05:00:00+5:302020-03-04T05:00:08+5:30

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून प्रारंभी केंद्र, बीट व तालुकास्तरीय क्रीडा महोत्सव घेण्यात आला. त्यातून निवडलेल्या विद्यार्थ्यांकरिता जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात हा महोत्सव घेणे अपेक्षित होते. मात्र, शिष्यवृत्ती परीक्षा, शिक्षकांचे प्रशिक्षण व महोत्सवाकरिता निधीची तरतूद आदी कारणांवरून अधिकारी-पदाधिकारी यांच्या बैठका चालल्या.

Eventually sports became the culmination of a cultural festival | अखेर क्रीडा, सांस्कृतिक महोत्सवाचा मुहूर्त ठरला

अखेर क्रीडा, सांस्कृतिक महोत्सवाचा मुहूर्त ठरला

ठळक मुद्देजिल्हा क्रीडा संकुलावर आयोजन : कार्यक्रमांवरील अडचणींचे सावट कायमच

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा दरवर्षी जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव आयोजित केला जायचा. यावर्षी अधिकारी व पदाधिकाऱ्यांमधील समन्वयाअभावी नियोजनात फेब्रुवारी महिना उलटला. अखेर काहींच्या ‘ना’ राजीनंतर क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाकरिता ६ ते ८ मार्च या तीन दिवसांचा मुहूर्त ठरविण्यात आला असून नियोजनही करण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून प्रारंभी केंद्र, बीट व तालुकास्तरीय क्रीडा महोत्सव घेण्यात आला. त्यातून निवडलेल्या विद्यार्थ्यांकरिता जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात हा महोत्सव घेणे अपेक्षित होते.
मात्र, शिष्यवृत्ती परीक्षा, शिक्षकांचे प्रशिक्षण व महोत्सवाकरिता निधीची तरतूद आदी कारणांवरून अधिकारी-पदाधिकारी यांच्या बैठका चालल्या. त्यातच ‘तारीख पे तारीख’ ठरविण्यात आल्या. अखेर जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे यांनी आठ दिवसांत महोत्सवाचे आयोजन करण्याच्या सूचना दिल्यानंतर शिक्षण विभागाकडून महोत्सवाचे नियोजन करण्यात आले. आता ६ ते ८ मार्च या तीन दिवसांत जिल्हा क्रीडा संकुलावर हा महोत्सव होणार आहे.
जिल्हा क्रीडा संकुलावर पुरेशा सुविधा नाही तसेच मार्च महिन्यात उन्हाचा तडाखा असल्याने या महोत्सवावरील अडचणीचे सावट कायमच असल्याचे दिसून येत आहे.

अशी केली आहे व्यवस्था
जिल्हास्तरीय या क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवामध्ये १० सांघिक खेळ, १४ शर्यती, ४ सांस्कृतिक, १ बॅण्ड व १ कवायत अशा ३० खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत ७५२ मुले व १ हजार ४० मुली सहभागी होणार आहेत. खेळाडू मुलींची निवास व्यवस्था सेवाग्राम मार्गावरील रमाबाई देशमुख पब्लिक स्कूल येथे करण्यात आली आहे. मुलांच्या निवासाची व्यवस्था बसस्थानकाजवळील महात्मा गांधी विद्यालयात करण्यात आली आहे. आवश्यकता पडल्यास चितोडा मार्गावरील सेंट जॉन विद्यालयात व्यवस्था करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांना निवासाच्या स्थानापासून क्रीडा संकु लापर्यंत नेण्या-आणण्याकरिता स्कूलबसची व्यवस्था केली आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून निवास व क्रीडा स्पर्धेच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तही मागविण्यात आला आहे. क्रीडा संकुल परिसरात मोबाईल टॉयलेट उपलब्ध करून देण्याबाबतही पालिकेला सुचित करण्यात आले आहे. यासह प्रथमोपचार सेवाही उपलब्ध राहणार आहे.

Web Title: Eventually sports became the culmination of a cultural festival