शहरं
Join us  
Trending Stories
1
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
2
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
3
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
4
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
5
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
6
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
7
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
8
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
9
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
10
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
11
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
12
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
13
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
14
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
15
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
16
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
17
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
18
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
19
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
20
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
Daily Top 2Weekly Top 5

मुख्य रस्त्याला अतिक्रमणाचा विळखा

By admin | Updated: May 7, 2017 00:41 IST

नगर पंचायत प्रशासनाने दाभा रोडवरील व तहसील परिसरातील अतिक्रमण मोठ्या साहसाने व तत्परतेने हटविले.

पादचाऱ्यांची सुरक्षा धोक्यात : रस्ता मोकळा करण्याची गरज लोकमत न्यूज नेटवर्क कारंजा (घा.) : नगर पंचायत प्रशासनाने दाभा रोडवरील व तहसील परिसरातील अतिक्रमण मोठ्या साहसाने व तत्परतेने हटविले. या महत्त्वाच्या कार्याबाबत नागरिकांनी प्रशासनाचे कौतुकही केले; पण नागरिक शहरातील मुख्य सिमेंट रस्त्यावरील वाढत्या अतिक्रमणामुळे त्रस्त आहे. हे अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करणे गरजेचे झाले आहे. या मार्गावर ग्राहकांना वाहन ठेवायला तर सोडा उभे राहायलाही जागा नाही. एखादी दुचाकी वा चारचाकी कधी अंगावार येईल, हे सांगता येत नाही. ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी यांना जीव मुठीत घेऊन ये-ज करावी लागते. ग्रा.पं. ने बांधलेल्या व्यापार संकुलामध्ये तर अतिक्रमणाने कळस गाठला आहे. येथील दुकानदार दुकानातील अधिकाधिक वस्तू दुकानासमोर मुख्य रस्त्यापर्यंत मांडतात. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. ग्राहकांना वाहने ठेवण्यास जागा नसते. नगर पंचायत प्रशासनाने या अतिक्रमाकडे त्वरित लक्ष देत कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. शहरात एकच मुख्य सिमेंट रस्ता आहे. या रस्त्याच्या दुतर्फा बाजारपेठ आहे. काही स्थायी आणि काही अस्थायी स्वरूपाची दुकाने आहेत. काही स्थायी दुकानदारांनी आपल्या मालकीच्या हक्काचे जागेएवढीच अधिकची जागा अतिक्रमण म्हणून बळकावली आहे. आणखी जागा कशी बळकावता येईल, याचा योजनाबद्ध प्रयत्न सुरू आहे. प्रथम टिनाचे शेड, नंतर विटाचे बांधकाम, नंतर निवडणुकीचा काळ पाहून कायम सिमेंटचे बांधकाम केले आहे. एवढ्यावरच न थांबता आता, दुकानाचा बोर्ड आणि साहित्य रस्त्यावर मांडण्यास प्रारंभ केला आहे. या प्रकारामुळे रस्ता मात्र निमूळता होत आहे. वाहतुक असुरक्षित झाली असून पादचाऱ्यांना चालतानाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. हे अतिक्रमण दररोज येजा-जाता नगरसेवक व इतर पदाधिकाऱ्यांच्या दृष्टीस पडते; पण राजकीय गणित कोण बिघडवून घेणार, या भीतीपोटी ते हटविण्यास कुणीही तयार नाही, हे वास्तव आहे. याची झळ मात्र सामान्य नागरिकांना सोसावी लागत आहे. सामान्यांची वाहतूक व जीव या रस्त्याने रहदारी कताना धोक्यात आले आहे. अतिक्रमणामुळे अनेक अपघात झाले असून अनेकांना जखमी व्हावे लागले आहे. भाजीपाला व फळ विक्रीसाठी ग्रामपंचायतने नवीन बाजारात लाखो रुपये खर्च करून मोठ-मोठे ओटे बांधून ठेवले आहेत. या ओट्यांवर भाजीपाला आणि फळविक्रीची दुाकने मांडली तर रस्त्यावरील अस्थायी अतिक्रमण हटून रस्त्यावरील गर्दी कमी होऊ शकते. शिवाय एकाच ठिकाणी भाजीपाला व फळे विकत घेणे ग्राहकांनाही सोयीचे होऊ शकते; पण हे करण्यासाठी कुणीही पुढाकार घेत नसल्याने असंतोष पसरला आहे. शहरातील मुख्य सिमेंट रस्त्यावर झालेल्या या अतिक्रमणाकडे नगर पंचायतच्या प्रशासकीय अधिकारी तथा पदाधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष देत कार्यवाही करावी. रस्ता खुला करून सामान्य नागरिकांची वाहतूक सुरक्षित करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.