कामकाजाच्या पहिल्याच दिवशी कर्मचाऱ्यांची पंचाईत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 05:00 IST2020-03-03T05:00:00+5:302020-03-03T05:00:51+5:30

सात दिवसाचा आठवडा असतानाही शासकीय कामाकरिता नागरिकांना उंबरठे झिजवावे लागतात. अशा स्थितीत राज्य शासनाने पाच दिवसांचा आठवडा जाहीर केला. यात कामकाजाच्या वेळेत ४५ मिनिटांनी वाढ करण्यात आली आहे. सकाळी ९.३० वाजता कार्यालय उघडल्यानंतर सायंकाळी ६.३० वाजतापर्यत सुरू राहणार आहे. अधिकारी व कर्मचाºयांनी कार्यालयात ९.४५ वाजतापासून ६.१५ पर्यंत उपस्थित राहून कर्तव्य पार पाडायचे आहे.

Employees' panchayats on the first day of work | कामकाजाच्या पहिल्याच दिवशी कर्मचाऱ्यांची पंचाईत

कामकाजाच्या पहिल्याच दिवशी कर्मचाऱ्यांची पंचाईत

ठळक मुद्दे‘लोकमत’ने घेतला आढावा : पाच दिवसांच्या आठवड्यानंतरही कर्मचारी सुस्तच

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : राज्य शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांकरिता पाच दिवसांचा आठवडा जाहीर केला. त्या आठवड्याच्या कामकाजाचा सोमवारी पहिला दिवस असल्याने जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये निवडक कार्यालयाला भेटी देऊन ‘लोकमत’ने आढावा घेतला. त्यादरम्यान नव्या वेळेनुसार कार्यालयात उपस्थित राहण्यासाठी अधिकारी व कर्मचाºयांची चांगलीच ‘पंचा’ईत झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पहिल्या दिवशी कार्यालय वेळेत उघडले तरी अधिकारी व कर्मचारी वेळेवर पोहोचले नसल्याचेच चित्र दिसून आले.
सात दिवसाचा आठवडा असतानाही शासकीय कामाकरिता नागरिकांना उंबरठे झिजवावे लागतात. अशा स्थितीत राज्य शासनाने पाच दिवसांचा आठवडा जाहीर केला. यात कामकाजाच्या वेळेत ४५ मिनिटांनी वाढ करण्यात आली आहे. सकाळी ९.३० वाजता कार्यालय उघडल्यानंतर सायंकाळी ६.३० वाजतापर्यत सुरू राहणार आहे. अधिकारी व कर्मचाºयांनी कार्यालयात ९.४५ वाजतापासून ६.१५ पर्यंत उपस्थित राहून कर्तव्य पार पाडायचे आहे. यामध्ये दुपारी १ ते २ वाजतादरम्यान अर्ध्यातासाचा भोजन अवकाश आहे. या नवीन वेळेनुसार कार्यालयात कर्मचारी उपस्थित राहतील, अशी अपेक्षा होती. त्यामुळेच ‘लोकमत’च्या चमूने पहिल्याच दिवशी सकाळी ९ वाजता तालुक्यातील निवडक कार्यालय गाठून परिस्थिती जाणून घेतली असता बहुतांश शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाºयांची नव्या आठवड्यातही जुन्या वेळेची सवय सुटलेली नसल्याचे दिसून आले. शिपायांनी कार्यालय वेळेवर उघडले मात्र, अधिकारी व कर्मचाºयांनी वेळेत पोहोचलेच नाही. काही कार्यालयातील वरिष्ठ अधिकाºयांनी सर्वांना सूचना दिल्याने कार्यालय प्रमुखांसह इतर कर्मचारीही कार्यालयात उपस्थित झाल्याचेही निदर्शनास आले.

सात तालुक्यांतील पंधरा कार्यालयांवर ‘वॉच’
च्लोकमच्या तालुकास्तरावरील प्रतिनिधींनी त्यांच्या तालुक्यातील एक किंवा दोन शासकीय कार्यालयाला भेटी देत पाच दिवसाच्या आठवड्यातील कामकाजाच्या पहिल्या दिवसाची परिस्थिती जाणून घेतली. यामध्ये वर्ध्यामध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, देवळीत तहसील कार्यालय, नगरपालिका, तालुका कृषी अधिकारी कार्यालय व पंचायत समिती, आर्वी येथे तालुका कृषी अधिकारी कार्यालय व जलसंपदा सिंचन विभाग, समुद्रपूर तहसील कार्यालय, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, शिक्षण विभाग व पंचायत समिती, हिंगणघाटमध्ये पंचायत समिती, सेलू तहसील कार्यालय व पंचायत समिती आणि आष्टी येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला भेट देऊन सकाळी ९ ते १० वाजतापर्यंत कर्मचारी व अधिकाºयांच्या उपस्थितीची माहिती जाणून घेतली.

Web Title: Employees' panchayats on the first day of work