शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
4
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
5
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
6
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
7
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
8
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
9
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
10
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
11
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
12
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
13
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
14
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
15
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
16
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
17
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
18
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
19
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
20
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
Daily Top 2Weekly Top 5

बोरगाव (मेघे) येथे अवैध मोबाइल टॉवरला महावितरणकडून विद्युत जोडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 23:30 IST

बोरगाव (मेघे) येथील वॉर्ड क्रमांक १ मध्ये स्वप्नील रावते तसेच योगेश वाटखेडे यांच्या घरावर मोबाइल कंपनीचे टॉवर उभे करण्यात आले. मोबाइल टॉवर उभे करताना स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या ग्रामपंचायतीचे नाहरकत प्रमाणपत्रसह परवानगी गरजेची असते. परंतु, मोबाइल टॉवरचे काम पूर्णत्वास नेणाऱ्यांनी बोरगाव (मेघे) ग्रा. पं. प्रशासनाकडून कुठलीही परवानगी घेतली नाही.

ठळक मुद्दे वीज जोडणी तोडण्यासाठी ग्रा.पं. प्रशासनाने एमएससीबीला पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या ग्रा. पं.ची कुठलीही परवानगी न घेता बोरगाव (मेघे) येथे दोन मोबाइल टॉवर उभारण्यात आले. इतकेच नव्हे तर या अवैध मोबाइल टॉवरला महावितरणकडून थेट विद्युत जोडणी देण्यात आल्याची बाब उजेडात येताच बोरगाव (मेघे) ग्रा. पं. प्रशासनाने अवैध टॉवरचा विद्युत पुरवठा खंडित करण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांना पत्र व्यवहार करण्यात आला, पण महावितरणकडून या पत्राला केराची टोपलीच दाखविली जात आहे. त्यामुळे याप्रकरणी महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांनी लक्ष देत योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी आहे.प्राप्त माहितीनुसार, बोरगाव (मेघे) येथील वॉर्ड क्रमांक १ मध्ये स्वप्नील रावते तसेच योगेश वाटखेडे यांच्या घरावर मोबाइल कंपनीचे टॉवर उभे करण्यात आले. मोबाइल टॉवर उभे करताना स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या ग्रामपंचायतीचे नाहरकत प्रमाणपत्रसह परवानगी गरजेची असते. परंतु, मोबाइल टॉवरचे काम पूर्णत्वास नेणाऱ्यांनी बोरगाव (मेघे) ग्रा. पं. प्रशासनाकडून कुठलीही परवानगी घेतली नाही. ही बाब लक्षात येताच बोरगाव (मेघे) ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने २० जानेवारी २०२१ रोजी जावक क्रमांक १९७ अन्वये महावितरणच्या कार्यालयाला पत्र पाठवून या मोबाइल टाॅवरला विद्युत पुरवठा करू नये, जर विद्युत पुरवठा करण्यात आला असल्यास तो तातडीने खंडित करण्यात यावा, अशी विनंती करण्यात आली. परंतु, महावितरणकडून या दोन्ही टॉवरचा विद्युत पुरवठा अद्यापही खंडित करण्यात आलेला नाही. त्यामुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केले जात आहे.

अन् सहाय्यक अभियंता झाले नि:शब्दचमहावितरणची बाजू जाणून घेण्यासाठी सहाय्यक अभियंता वीरेंद्र कळसकर यांच्याशी संपर्क साधला असता वरिष्ठांना विचारून आपली बाजू मांडतो असे सांगितले. पण रात्री ९ पर्यंत त्यांनी आपली बाजू सांगितली नाही. 

वॉर्ड १ मधील दोन्ही टॉवरला बोरगाव (मेघे) ग्रा. पं.ने कुठलीही परवानगी दिलेली नाही. असे असतानाही महावितरणने या दोन्ही टॉवरला विद्युत जोडणी दिली आहे. या मोबाइल टॉवरची विद्युत जोडणी खंडित करण्यासाठी ग्रा. पं. प्रशासनाने महावितरणला पत्र पाठविले आहे.- मोहन येरणे, उपसरपंच, बोरगाव (मेघे)

 

टॅग्स :Mobileमोबाइलmahavitaranमहावितरण