समुद्रपूर तालुक्यावर ओल्या दुष्काळाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 06:00 AM2019-09-11T06:00:00+5:302019-09-11T06:00:25+5:30

सततच्या पावसाने शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्यांना सळो की पळोच करून सोडल्याचे चित्र सध्या बघावयास मिळत आहे. २९ जुलैपासून तालुक्यात थांबून थांबून मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक शेतात पावसाचे पाणी साचत असून काही शेत शिवारांना तळ्याचे स्वरूप आले आहे.

Drought season | समुद्रपूर तालुक्यावर ओल्या दुष्काळाचे सावट

समुद्रपूर तालुक्यावर ओल्या दुष्काळाचे सावट

Next
ठळक मुद्देसोयाबीन अन् कपाशीच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता

सुधीर खडसे।
लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : जून महिन्याच्या अखेरीस झालेल्या पावसादरम्यान अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन व कपाशीची लागवड केली. त्यानंतर तब्बल २२ दिवसांचा पावसाचा खंड पडला. परिणामी अंकुरलेली विविध पीक करपण्याच्या मार्गावर होती. अशातच मागील दोन आठवड्यापासून थांबून थांबून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. सध्या पीक पिवळी पडत असून संपूर्ण तालुक्यावर ओल्या दुष्काळाचे सावट आहे.
सततच्या पावसाने शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्यांना सळो की पळोच करून सोडल्याचे चित्र सध्या बघावयास मिळत आहे. २९ जुलैपासून तालुक्यात थांबून थांबून मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक शेतात पावसाचे पाणी साचत असून काही शेत शिवारांना तळ्याचे स्वरूप आले आहे. मोठ्या प्रमाणात शेत शिवारांमध्ये पाणी साचून असल्याने सध्या पीक पिवळी पडत आहेत. शेतातील पाण्यामुळे कपाशीचे पान गळत आहेत.
यामुळे यंदाही नापिकीला तोंड द्यावे लागले, अशी शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे. तालुक्यातील कपाशी व सोयाबीन पीक सध्या आॅक्सीजनवर असल्याचे दिसून येत आहे. दिवाळी बोनस अशी ओळख असलेले सोयाबीनचे पीक दिवाळीच्या तोंडावरच शेतकऱ्यांना दगा देणार, असेही वृद्ध शेतकरी सांगतात. सततच्या पावसामुळे तालुक्यावर सध्या ओल्या दुष्काळाचे सावट आहे. अनेक शेतकºयांना पावसामुळे मशागतीची कामे करता आली नाही. अशातच ढगाळ वातावरण असल्याने त्याचा परिणामही उभ्या पिकांवर होत आहे. इतकेच नव्हे तर पिकांची वाढही खुंटल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. संपूर्ण तालुक्याच्या शेत पिकांची परिस्थिती पाहता समुद्रपूर तालुक्याला ओल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत टाकावे तसेच तालुक्यातील शेतकºयांना भरीव शासकीय मदत द्यावी, अशी मागणी आहे.

कष्टकऱ्याचा रोजगार हिरावला
शेतमजुरीची कामे करून कुटुंबाचा गाढा ओढणाऱ्यांची संख्या तालुक्यात मोठी आहे. परंतु, पावसाने त्यांच्याही अडचणीत भर टाकली आहे. सततच्या मुसळधार पावसाने त्यांचा रोजगारच सध्या हिराव्याचे दिसून येत आहे. सदर कष्टकऱ्यांवर उपासमारीचीच वेळ आली आहे. त्यामुळे तालुका प्रशासनाने त्यांच्या हाताला काम देण्याची गरज आहे.

Web Title: Drought season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.