शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

विवंचनेने करपलाय शेतकऱ्यांचा दीपोत्सव

By admin | Updated: October 22, 2014 23:21 IST

दिवाळीची सर्वत्र लगबग सुरू आहे. शहरातील दिवाळीचा झगमगाट डोळे दीपवणारा आहे; पण ग्रामीण भागात दिवाळी आहे, असे वाटत नाही. आर्थिक विवंचनेमुळे शेतकऱ्यांच्या अंगात बळच उरले नाही.

सेलू : दिवाळीची सर्वत्र लगबग सुरू आहे. शहरातील दिवाळीचा झगमगाट डोळे दीपवणारा आहे; पण ग्रामीण भागात दिवाळी आहे, असे वाटत नाही. आर्थिक विवंचनेमुळे शेतकऱ्यांच्या अंगात बळच उरले नाही. अनेक शेतकऱ्यांना दिवाळी कशी साजरी करायची, याची चिंता आहे. दारात दिवाळीचा दिवा लावताना तेल टाकण्याची कुवत नाही. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या गृहिणी कापसाच्या वाती कशाबशा भिजवून दीपोत्सव साजरा करताहेत; पण तेल नसल्याने दिवणालीतील वातही करपून जात असल्याचे विदारक चित्र आहे़लहरी निसर्गाचा जबर फटका शेतकऱ्यांना यंदा बसला. दोन-तीन झालेच तर चार पोते प्रती एकराच्या वर सोयाबीनचा उतारा नाही. अनेकांनी सवंगणी केली नाही. पिकापेक्षा गवतच अधिक आहे. धान्य बाजारात तीन हजारांच्या वर भाव नाही. दिवाळीत बाजार समित्याही बंद आहेत़ ज्यांचे सोयाबीन निघाले, त्यांना विकण्याचीही अडचण आहे. अनेकांचे सोयाबीन निघायचे आहे. कपाशी अद्याप निघाली नाही़ काहींची शितादही झाली. बाजारपेठ सुरू झाली नाही. हातात पैसा नाही. सर्वच भिस्त शेतीवर असल्याने कर्ज फेडायचे की घरी खायचे, याचाही ताळमेळ नाही. शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांना दिवाळीला नवीन कपड्यांची वाणवाच आहे. चिमुकल्या मुलांनी नवीन कपडे, फटाके, मागितले की, पालकांची कालवा-कालव होते. सणालाही नवीन कपडे आपण देऊ शकत नाही, याचे दु:ख शेतकऱ्यांनी पचवायचे कसे, हा प्रश्न आहे. घरातील ही स्थिती पाहून गृहलक्ष्मी कधी नवीन साडीचा आग्रह करीत नाही; पण बाजूच्या एखाद्या नोकरदाराच्या पत्नीला आणलेली साडी पाहून तिचाही जीव करपलेल्या वातीसारखाच जळतो, हे विदारक वास्तव ग्रामीण भागात फिरल्याशिवाय दिसत नाही. गत दोन दिवसांत ग्रामीण भागात दिसलेले वास्तव पाषाणहृदयी व्यक्तींच्याही डोळ्यांतही पाणी आणल्याशिवाय राहत नाही. शारीरिकदृष्ट्या शेतकरी सक्षम दिसत असला तरी मनातून खचला आहे़ नवनिर्वाचित आमदारांना शेतकऱ्यांची चिंता असेल तर ग्रामीण भागात जाऊन यावे, शेतकऱ्यांच्या वेदना, अडचणी, चिंता तपासून नुकसानग्रस्तांच्या तोंडाला कशी पाने पुसली, याचा लेखाजोखा शेतकऱ्यांचा कैवारी म्हणून मांडावे, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करताहेत़(तालुका प्रतिनिधी)