शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

बाप्पाला निरोप

By admin | Updated: September 9, 2014 00:33 IST

गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या.. एक लाडू फुटला... गणपत्ती बाप्पा उठला... असे म्हणत दहा दिवस घरोघरी विराजमान झालेल्या गणरायाचे अखेर शनिवारपासून विसर्जन करणे सुरू झाले.

प्रशासनाकडून चोख बंदोबस्त : शासनाच्या सूचनांचे पालन करण्याचा प्रयत्नवर्धा : गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या.. एक लाडू फुटला... गणपत्ती बाप्पा उठला... असे म्हणत दहा दिवस घरोघरी विराजमान झालेल्या गणरायाचे अखेर शनिवारपासून विसर्जन करणे सुरू झाले. ढोल ताश्याच्या निनादात स्वागत झालेल्या गणेशाला त्याच पद्धतीने निरोपही देण्यात आला. घरी गणरायाची स्थापना करणाऱ्यांनी कुठे विहिरीत तर कुठे तलावात गणरायाचे विसर्जन केले. सकाळपासून असलेल्या पावसामुळे ताशाच्या ठेक्यावर मनमुराद नाचण्याचा अनेकांनी आनंद घेतल्याचे चित्र होते. पवनार येथील धाम नदीवर गणेशमूूर्तीच्या विसर्जनाची गर्दी द्वादशी पासून सुरू झाली. त्रयोदशीला अनेक घरगुती मूर्तीचे विसर्जन झाले. उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे जल प्रदुषण होऊ नये म्हणून प्रशासन प्रयत्नशिल आहे. परंतु काही प्रमाणात का होईना निर्माल्य नदीमध्ये पडलेच. घरगुती गणपती गणेश कुंडामध्ये विसर्जित करण्याकरिता जिल्हा परिषद व ग्राम पंचायतीच्यावतीने गणेश कुंडाची व्यवस्था केली. शहरात पालिकेच्यावतीने ठिकठिकाणी पालिकेच्यावतीने ड्रम ठेवून नागरिकांना विसर्जनातून होत असलेल्या प्रदुषणाची माहिती देण्यात आली. याला वर्धेकरांकडून बऱ्या प्रमाणात साथही मिळाली. (प्रतिनिधी)पट्टीच्या पोहणाऱ्यांची चमू सेवाग्राम पोलिसांच्यावतीने विसर्जनाच्यावेळी कुठलीही गडबड होवू नये म्हणून चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. गणेश विसर्जनासाठी राहुल बावणे, शुभम बावणे, राहुल बोरघरे, धिरज बावणे, खुशाल बोरकर, मोरेश्वर हजारे, विवेक राऊत, सुरज मोहिजे, किशोर हजारे, जिवन ठाकरे, शंकर बावणे, इंद्रजित मोहिजे या पट्टीच्या पोहणाऱ्यांची स्वयंसेवक म्हणून नियुक्त केली आहे. त्यांना तसे टी शर्ट पुरविण्यात आले आहे.मचानीवरून लक्षकुठलीही दुर्घटना होऊ नये म्हणून मचानीवरून दुर्बीणीद्वारे टेहळणी केली जात असून वाहतुक व्यवस्था विस्कळीत होऊ नये म्हणून ट्राफिक पोलीस आपले कर्तव्य चोख बजावताना दिसत आहे. सेवाग्राम पो.स्टे.चे ठाणेदार पराग पोटे आपल्या सहकाऱ्यासह व्यवस्थेवर जातीने लक्ष ठेऊन आहे.