शतकाच्या झंझावातात मृत्यूचा आलेख वाढताच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 05:00 AM2020-09-21T05:00:00+5:302020-09-21T05:00:31+5:30

जिल्ह्यामध्ये लॉकडाऊच्या काळात दीड महिना कोरोनाला एन्ट्री मिळाली नाही. त्यानंतर १० मे रोजी कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर गाफील नागरिकांमुळे कोरोनाने साखळी मजबूत करायला सुरुवात केली. बघता-बघता दर दिवसाला आठ ते दहा रुग्णाची सरासरी पन्नासपार गेली. सप्टेंबर महिन्यामध्ये अपवाद वगळता दरदिवसाला शंभरावर रुग्ण आढळून येत आहे. रविवारलाही एकाच दिवशी ११५ कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे.

As the death toll rises in the storm of the century | शतकाच्या झंझावातात मृत्यूचा आलेख वाढताच

शतकाच्या झंझावातात मृत्यूचा आलेख वाढताच

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोनास्थिती : रविवारी ११५ रुग्ण, तिघांचा झाला मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शिथिलतेनंतर नागरिकांनी फारसे मनावर घेतले नसल्याची संधी साधून कोरोनाने आपली धुव्वाधार बॅटींग सुरु केली आहे. अपवाद वगळता दररोजच शंभरावर कोरोनाबाधित आढळून येत आहे. यासोबतच मृत्यूंच्या संख्येतही वाढत होत असल्याने वर्धेकरांच्या चिंतेत आणखीच भर पडली आहे. कोरोेनाची वाढती संख्या आणि रुग्णालयामध्ये खाटांची असलेली कमतरता लक्षात घेता नागरिकांनी बेभान वागणुकीला बे्रक लावण्याची गरज निर्माण झाली आहे.
जिल्ह्यामध्ये लॉकडाऊच्या काळात दीड महिना कोरोनाला एन्ट्री मिळाली नाही. त्यानंतर १० मे रोजी कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर गाफील नागरिकांमुळे कोरोनाने साखळी मजबूत करायला सुरुवात केली. बघता-बघता दर दिवसाला आठ ते दहा रुग्णाची सरासरी पन्नासपार गेली. सप्टेंबर महिन्यामध्ये अपवाद वगळता दरदिवसाला शंभरावर रुग्ण आढळून येत आहे. रविवारलाही एकाच दिवशी ११५ कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या ३ हजार ३९० झाली आहे.
यापैकी १ हजार ६३३ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सध्या १ हजार ६६८ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. कोरोनाची वाढती रुग्ण संख्या आणि रुग्णालयातील सुविधांची उपलब्धता, यामुळे आतापर्यंत ८८ कोरोनाबाधितांना आपला जीव गमवावा लागला. रविवारी तीन रुग्णांचा मृत्यू झाला असून यामध्ये समुद्रपूर व वर्धा येथील पुरुषांचा तर पुलगावच्या महिलेचा समावेश आहे.

जिल्ह्यातील ५३ रुग्ण झाले कोरोनामुक्त
जिल्ह्यात आतापर्यंत ३० हजार ७९५ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी ३० हजार ७४६ व्यक्तींचा अहवाल प्राप्त झाला असून त्यापैकी २७ हजार ००६ व्यक्तींना अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे ३ हजार ३९० कोरोनाबाधित आढळून आले आहे. अद्याप ३९ अहवाल प्रलंबित असून रविवारी पुन्हा ४३९ व्यक्तीचे नमुने तपासणीकरिता पाठविले आहे. कोरोनाची रुग्ण संख्या वाढत असून बरे होणाऱ्यांचेही प्रमाण मोठे आहे. आज ५३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना कोरोनामुक्त करण्यात आले. आतापर्यंत १ हजार ६३३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. सध्या १ हजार ६६८ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून ते गृह अलगीकरणात किंवा रुग्णालयात उपचार घेत आहे.

Web Title: As the death toll rises in the storm of the century

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.