शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
3
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
4
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
5
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
6
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
7
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
8
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
9
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
10
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
11
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
12
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
13
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
14
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
15
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
16
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
17
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
18
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
19
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
20
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

लिलाव न झाल्याने नगर पंचायतचे नुकसान

By admin | Updated: May 23, 2016 02:11 IST

नगर पंचायतच्या निवडणुका होऊन अध्यक्ष व पदाधिकारी स्थानापन्न झाले. यास १४ महिन्यांचा कालावधी लोटला;

आठवडी बाजाराचा प्रश्न : पदाधिकाऱ्यांची अनास्थासमुद्रपूर : नगर पंचायतच्या निवडणुका होऊन अध्यक्ष व पदाधिकारी स्थानापन्न झाले. यास १४ महिन्यांचा कालावधी लोटला; पण अद्यापही आठवडी बाजाराचा लिलाव करण्यात आला नाही. परिणामी, नगर पंचायतीला मोठे नुकसान सोसावे लागत आहे. अद्याप बाजाराचा लिलाव का करण्यात आला नाही, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. नगर पंचायतीला सर्वाधिक महसुली उत्पन्न देणारा आठवडी बाजार आहे. या बाजाराचा लिलाव का करण्यात आला नाही, हा प्रश्नच आहे. सदर बाजार आठ-दहा एकराच्या परिसरात भरतो. जिल्हा परिषदेच्या जुन्या बाजार ठेकेदाराकडून नाममात्र ५ हजार रुपये दराने वसुली केली जाते. प्रत्यक्षात, किमान २० हजार रुपयांवर प्रत्येक बाजाराची वसुली होते. वसुली करणारा कंत्राटदार व नगर पंचायतच्या विशिष्ट पदाधिकाऱ्यांचे साटेलोटे असल्याची चर्चा खासगी गावकट्टावर सुरू आहे. प्रत्येक बाजाराला नगर पंचायतचे १५ ते १८ हजार रुपयांचे नुकसान होते. विशेष म्हणजे जानेवारी ते मे पर्यंत बाजार मोठ्या प्रमाणात भरतो. यानंतर पावसाळ्यात बाजार कमी प्रमाणात भरत असून वसुलीही कमी होते. यामुळेच जाणीवपूर्वक बाजाराच्या भरभराटीच्या काळात लिलाव केला जात नसल्याचे दिसून येते. यात नगर पंचायतीच्या मोजक्या पदाधिकाऱ्यांचे आर्थिक संबंध गुंतले असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.एकाचवेळी स्थापन झालेली सेलू व समुद्रपूर नगर पंचायत आहे. सेलू नगर पंचायतीच्या बाजाराचा मोठ्या रकमेत एक महिन्यापूर्वी लिलाव झाला; पण समुद्रपूर नगर पंचायतच्या बाजाराचा लिलाव का होत नाही, हा संशोधनाचा विषय आहे. समुद्रपूर नगर पंचायतीला नियमित मुख्याधिकारी नसल्याचा कांगावा केला जातो; पण सेलू नगर पंचायतीलाही नियमित मुख्याधिकारी नसताना लिलाव होतो तर समुद्रपूरला का नाही, हा प्रश्न मात्र अनुत्तरीत आहे.(तालुका प्रतिनिधी)