सायंकाळी पाच ते सकाळी सात वाजेपर्यंत राहणार कर्फ्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 05:00 AM2020-03-25T05:00:00+5:302020-03-25T05:00:06+5:30

जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी काढलेल्या आदेशानुसार अत्यावश्यक सुविधांतर्गत जीवनावश्यक वस्तुंची दुकाने सुरु राहणार आहे. या सर्व दुकानदारांनी आपल्या दुकानासमोर एकेक मीटरचे चुन्याने चौकोण तयार करायचे आहे. त्या एका बॉक्समध्ये एका व्यक्तीला उभ करुन क्रमानुसार प्रथम आलेल्यांना पहिले साहित्य द्यावे, जेणे करुन दुकानासमोर गर्दी होणार नाही. सोबतच आलेल्या ग्राहकांमध्येही अंतर ठेवता येणार आहे.

The curfew will be from five to seven in the evening | सायंकाळी पाच ते सकाळी सात वाजेपर्यंत राहणार कर्फ्यू

सायंकाळी पाच ते सकाळी सात वाजेपर्यंत राहणार कर्फ्यू

Next
ठळक मुद्देकामाशिवाय बाहेर पडण्यास मनाई : जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानातील गर्दी टाळावी

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यातील आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता संचारबंदी लागू करण्यात आली असून सायंकाळी ५ ते सकाळी ७ वाजतापर्यंत सर्वत्र कर्फ्यू राहणार आहे. तसेच दिवसभर कामाशिवाय बाहेर पडण्यास मनाई असून बाहेर पडणाऱ्यावर कारवाई किंवा पोलिसांच्या दंडुक्याचा मार खावा लागणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आता ३१ मार्चपर्यंत कामाशिवाय बाहेर न पडता घरीच राहण्यावर भर देणे गरजेचे आहेत.
जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी काढलेल्या आदेशानुसार अत्यावश्यक सुविधांतर्गत जीवनावश्यक वस्तुंची दुकाने सुरु राहणार आहे. या सर्व दुकानदारांनी आपल्या दुकानासमोर एकेक मीटरचे चुन्याने चौकोण तयार करायचे आहे. त्या एका बॉक्समध्ये एका व्यक्तीला उभ करुन क्रमानुसार प्रथम आलेल्यांना पहिले साहित्य द्यावे, जेणे करुन दुकानासमोर गर्दी होणार नाही. सोबतच आलेल्या ग्राहकांमध्येही अंतर ठेवता येणार आहे. ही उपाययोजना न केल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल. दुकानदारांनी आपल्या दुकानांसमोर नागरिकांना हात धुन्याकरिता व्यवस्थाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. सोबतच सायंकाळी ५ ते सकाळी ७ वाजतापर्यंत संचारबंदी संचारबंदी राहणार असून या दरम्यान औषधाची दुकाने वगळता सर्व दुकाने बंद राहतील. कोणत्याही कारणाशिवाय कोणत्याही नागरिकांनी रस्त्यावर फिरू नये व शासनाच्या आदेशाचे पालन करावे. सायंकाळी ५ नंतर कुणीही व्यक्ती किंवा व्यक्तींचा समुह दिसून आल्यास त्यांच्यावर जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाकडून सक्तीची कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे. त्यामुळे वर्ध्याचे उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, आर्वीचे उपविभागीय अधिकारी हरिश धार्मिक व हिंगणघाटचे उपविभागीय अधिकारी चंद्रकांत खंडाईत यांनी आपापल्या विभागातील तालुक्यांना सूचना दिल्या आहे.

Web Title: The curfew will be from five to seven in the evening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.