शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

एकाच दिवशी 19,615 व्यक्तींना काेविड व्हॅक्सिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 05:00 IST

विशेष म्हणजे शुक्रवारी आरोग्य विभागाने जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात लसीकरण मोहिमेला गती दिली असता, नागरिकांचा त्याला स्वयंस्फूर्त प्रतिसाद मिळाला. शुक्रवारी एकाच दिवशी तब्बल १९ हजार ६१५ व्यक्तींनी कोरोनाची लस घेतली. यात लसीचा पहिला डोस घेणाऱ्या १२ हजार २४ व्यक्ती तर लसीचा दुसरा डोस घेणाऱ्या ७ हजार ५९२ लाभार्थींचा समावेश आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात लसीकरण मोहिमेने शुक्रवारी ओलांडला पाच लाखांचा टप्पा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शासनाकडून अल्प लससाठा देऊन वर्धा जिल्ह्याची लसकोंडी केली जात असली तरी तोकड्या लससाठ्याच्या जोरावर जिल्ह्यातील आरोग्य विभागाने कोविड लसीकरणाचा पाच लाखांचा टप्पा ओलांडला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ३ लाख ८१ हजार १८६ व्यक्तींना लसीचा पहिला तर १ लाख १९ हजार ३६६ लाभार्थींना कोविड व्हॅक्सिनचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत.विशेष म्हणजे शुक्रवारी आरोग्य विभागाने जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात लसीकरण मोहिमेला गती दिली असता, नागरिकांचा त्याला स्वयंस्फूर्त प्रतिसाद मिळाला. शुक्रवारी एकाच दिवशी तब्बल १९ हजार ६१५ व्यक्तींनी कोरोनाची लस घेतली. यात लसीचा पहिला डोस घेणाऱ्या १२ हजार २४ व्यक्ती तर लसीचा दुसरा डोस घेणाऱ्या ७ हजार ५९२ लाभार्थींचा समावेश आहे. सोमवारी पुन्हा नव्या जोमाने लसीकरण मोहिमेला गती देण्याचे आरोग्य विभागाच्या विचाराधीन असून केवळ लससाठ्याची प्रतीक्षा आहे.

तरुणांमध्ये उत्साह- शुक्रवारी एकाच दिवशी १९ हजार ६१५ व्यक्तींनी नजीकच्या केंद्रावर जाऊन कोविडची प्रतिबंधात्मक लस घेतली. यात १५९ हेल्थ केअर वर्कर्स, ७४ फ्रन्टलाईन वर्कर्स, १८ ते ५५ वयोगटातील १० हजार १३ व्यक्ती, ४५ ते ६० वयोगटातील ५ हजार ६६५ व्यक्ती तर ६० पेक्षा जास्त वयोगटातील ३ हजार ७०४ लाभार्थींचा समावेश आहे. एकूणच शुक्रवारी लसीकरणाबाबत तरुणांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.

जिल्ह्याला कोविडची लस टप्प्याटप्प्याने मिळत आहे. लससाठा मिळताच जिल्ह्यात व्हॅक्सिनेशन मोहिमेला गती दिली जात आहे. आतापर्यंत ३ लाख ८१ हजार १८६ लाभार्थींना लसीचा पहिला तर १ लाख १९ हजार ३६६ लाभार्थींना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे.- डॉ. अजय डवले, जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस